Shreya Maskar
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने आजवर आपल्या कॉमेडीने चाहत्यांना खूप हसवले आहे. 'बिग बॉस मराठी'मध्ये एन्ट्री त्यांच्या करिअरसाठी खूप खास ठरेल.
सध्या नॅशनल क्रश गिरिजा ओकची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. एका निळ्या साडीमुळे गिरिजाला जगभरात लोकप्रियता मिळाली.
'बिग बॉस 19' चा दुसरा रन-रप प्रणित मोरे ठरला. त्याला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखले जाते. बिग बॉस मराठीमध्ये ही आपली छाप पाडायला तो येऊ शकतो.
सबसे कातील गौतमी पाटील नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती 'बिग बॉस मराठी'मध्ये येताच शो आणि कलर्स वाहिनीचा टीआरपी प्रचंड वाढू शकतो.
गायक रोहित राऊत हा भारताचा पहिला 'I-पॉपस्टार' ठरला आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याच्या आवाजाचे चाहते दिवाने आहेत.
'माझ्या नवऱ्याची बायको'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली रसिका सुनीलच्या नावाची देखील चर्चा पाहायला मिळत आहे. रसिकाच्या स्टायलिश अदा कार्यक्रमाची उंची नक्कीच वाढवू शकतात.
'झट पट पटापट' म्हणत सध्या डॅनी पंडित झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याला बिग बॉसमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.
'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेत्री ईशा केसकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने अचानक मालिक सोडल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे यांनी आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
विनायक माळी हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. 'बिग बॉस मराठी 6' चे होस्टिंग रितेश देशमुख करणार असून हा कार्यक्रम 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि jiohotstar वर पाहायला मिळणार आहे.