'धुरंधर' चित्रपटातील आयशा खानचे 'शरारत' गाणे खूपच गाजत आहे.
आयशा खान आता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.
'धुरंधर' 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या टिव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' मध्ये दिसलेली आयशा खान आता पुन्हा एकदा 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. 5 डिसेंबर 2025 ला रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटात 'शरारत' गाण्यात आयशा खान पुन्हा दिसली. आपल्या हटके स्टाइल , कातिल अदा आणि उत्तम डान्सने तिने या गाण्याला चारचाँद लावले. 'शरारत' गाणे सोशल मीडियावर गेले काही दिवस ट्रेंडवर पाहायला मिळत आहे. आयशा खान 'धुरंधर' नंतर कपिल शर्माच्या 12 डिसेंबर 2025 ला रिलीज झालेल्या 'किस किसको प्यार करूं २' या चित्रपटातही दिसली.
'धुरंधर' च्या यशानंतर आयशा खानला आता मोठी लॉटरी लागली आहे. आयशा खान आता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयशा खानला अक्षय कुमारच्या 'भागम भाग 2' मध्ये कास्ट करण्यात आली आहे. चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका ती साकारणार आहे.'भागम भाग' 2006 साली रिलीज झाला होता. आता 20 वर्षांनी चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप 'भागम भाग 2'मधील आयशा खानच्या एन्ट्री बद्दल अधिकृत घोषणा झाली नाही.
आयशा खानला अक्षय कुमारसोबत पाहायला चाहते खूपच उत्सुक आहेत. आयशा खानने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरूवात केली. तिने 'कसौटी जिंदगी की 2', 'बालवीर रिटर्न्स' या मालिकांमध्ये काम केले होते. तिचा बिग बॉसमधील खेळही प्रेक्षकांना खूप आवडला. 'शरारत' गाण्यामुळे आयशा खानला खूप लोकप्रियता मिळाली आहे.
'भागम भाग 2' चे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. तर 'भागम भाग' प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. पहिल्या भागात अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. आता चाहते 'भागम भाग 2'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.