Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

Riteish Deshmukh - Shiv Jayanti 2026 : शिव जयंतीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख शिवनेरी केल्यावर पोहचला आहे. त्याने चाहत्यांना एक खास मेसेज दिला आहे.
Riteish Deshmukh - Shiv Jayanti 2026
Riteish Deshmukhsaam tv
Published On
Summary

आज राज्यभरात शिव जयंतीचा उत्सुक पाहायला मिळत आहे.

अभिनेता रितेश देशमुख शिवनेरी केल्यावर पोहचला.

किल्ले शिवनेरीवर शिव जन्मोत्सव सोहळा पार पडताना दिसत आहे.

राज्यभरात आज शिव जयंतीचा उत्सुक पाहायला मिळत आहे. किल्ले शिवनेरीवर शिव जन्मोत्सव सोहळा पार पडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय नेते, कलाकार मंडळी शिवनेरीवर जाताना दिसत आहे. आज 19 फ्रेबुवारी 2026 शिव जयंती साजरी केली जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी छोटे सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठा इतिहास घडवला आहे. महाराज एक प्रेरणा स्थान आहे. किल्ले शिवनेरी फुलांनी सजला आहे. भक्तांची येथे गर्दी येथे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख देखील सकाळी शिवनेरी किल्ल्यावर पोहचला. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि जनतेला शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मीडियाशी संवाद साधताना रितेश देशमुख म्हणाला की, "सर्व शिव भक्तांना, शिव प्रेमींना आज शिव जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... आज आपल्या सारख्या भक्तांसाठी प्रेरणेचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्याला अशी प्रेरणा मिळते की, आपल्याला जी काही कामे करायची आहेत, ती परिपूर्ण व्हावी... अशाच सर्वांना शुभेच्छा देतो."

रितेश देशमुख गेल्या काही काळापासून आपला आगामी चित्रपट 'राजा शिवाजी'मुळे चांगला चर्चेत आहे. अलिकडेच चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट 1 मे 2026 म्हणजे महाराष्ट्र दिनाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

स्टारकास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटातील गाण्यांना अजय-अतुलचे संगीत आहे. चित्रपटात रितेश देशमुखसोबत जिनिलीया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते हे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. चाहते आता 'राजा शिवाजी' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Riteish Deshmukh - Shiv Jayanti 2026
Samir Choughule : समीर चौघुलेचा आनंद गगनात मावेना, कॉमेडी King 'या' पुरस्काराने सन्मानित, प्राजक्ता माळीने केलं खास कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com