Samir Choughule : समीर चौघुलेचा आनंद गगनात मावेना, कॉमेडी King 'या' पुरस्काराने सन्मानित, प्राजक्ता माळीने केलं खास कौतुक

Samir Choughule Got Award : कॉमेडी किंग समीर चौघुलेला कलाविश्वातील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याने आजवर आपल्या विनोदी वृत्तीने अवघ्या जगाला हसवले आहे.
Samir Choughule Got Award
Samir Choughulesaam tv
Published On
Summary

मराठी अभिनेता समीर चौघुले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला.

'झी चित्र गौरव २०२६' या पुरस्कार सोहळ्यात समीरला गौरवण्यात आले.

'गुलकंद' चित्रपटासाठी समीर चौघुलेला पुरस्कार मिळाला.

मराठी मनोरंजन सृष्टीतील महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी एक असलेला 'झी मराठीचा चित्र गौरव पुरस्कार 2026' नुकताच थाटामाटात पार पडला आहे. अनेक मोठ्या, नवीन कलाकारांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे. सध्या या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा ' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला अभिनेता समीर चौघुलेचाही सन्मान करण्यात आला आहे. ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा ' मध्ये अनेक वेगवेगळी पात्र करून त्याने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. अलिकडेच तो सई ताम्हणकरसोबत 'गुलकंद' या चित्रपटात झळकला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. त्याने आजवर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गुलकंद' चित्रपटाच्या यशामागे समीर चौघुलेचा मोठा वाटा आहे. समीर चौघुलेला 'गुलकंद' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 'गुलकंद' चित्रपट 1 मे 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. पुरस्कार स्वीकारून समीर चौघुले खूपच खुश आहे.

'गुलकंद' चित्रपटात खूप तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. यात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांची जोडी झळकली. त्यानंतर ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे हे कलाकार देखील पाहायला मिळाले. पुरस्कारासंबंधित एक खास पोस्ट समीर चौघुले याने सोशल मीडियावर केली आहे. त्याच्या पोस्टवर चाहते, कलाकार आणि मित्रमंडळी कमेंट्स करून शुभेच्छा देताना दिसत आहेत. "अभिनंदन समीर दा!" अशी कमेंट प्राजक्ता माळीने केली आहे. तर "Samyyyyaaaaa तुझा खूप अभिमान आहे..." असे म्हणत अमृता खानविलकरने कौतुक केले आहे.

समीर चौघुले पोस्ट

"झी चित्र गौरव २०२६- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता (चित्रपट गुलकंद)

रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार ... आणि खास आभार सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर यांचे...तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे... इशा डे तुला ही सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री या भागात पुरस्कार मिळाला आहे...तुझे आभाळा एवढे कौतुक...Everest Entertainment चे मनापासून आभार...माझे गुरु विश्वास सोहोनी यांना प्रणाम....last but not the least special thanks to सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक..."

Samir Choughule Got Award
Prasad Oak : प्रसाद ओकची गगन भरारी; अभिनेत्याच्या नावावर 2 विश्वविक्रमांची नोंद, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com