Shreya Maskar
गुलाबाच्या पाकळ्यांचा चवदार गुलकंद बनवा. गुलकंदापासून नाश्त्याला स्वादिष्ट आणि खमंग गुलकंद शिरा बनवा. हा पदार्थ 10-15 मिनिटांत तयार होते.
गुलकंद शिरा बनवण्यासाठी रवा, तूप, गुलकंद, साखर, दूध , पाणी, वेलची पूड , गुलाबी रंग, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
गुलकंद शिरा बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप टाकून रवा गोल्डन फ्राय करा. शिरा बनवण्यासाठी बारीक रव्याचा वापर करा. तसेच रवा फ्राय करताना गॅस कमी ठेवा.
भाजलेल्या रव्यात थंड दूध आणि अर्धा वाटी पाणी हळूहळू घाला. रवा सर्व पाणी शोषून घेईपर्यंत चांगले मिक्स करा.
रवा ५-१० मिनिटे शिजवून घ्या. आता त्यात गुलकंद, साखर, वेलची पावडर आणि सुकामेवा टाका. तुम्ही साखरे ऐवजी गूळ देखील टाकू शकता.
गुलकंद सर्व शिऱ्यामध्ये एकसारखा मिसळला पाहिजे, याची काळजी घ्या. गॅस कमी करून शिरा परतून घ्या.
शिऱ्यातील साखर विरघळली, तूप बाजूने सुटू लागले की,गॅस बंद करा. जेणेकरून आपला स्वादिष्ट गुलकंद शिरा जळणार नाही.
शेवटी गुलकंद शिऱ्यावर वरून थोडं तूप आणि बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स टाकून गुलकंद शिऱ्याचा आस्वाद घ्या.