Beetroot Barfi Recipe : तुम्हाला वारंवार गोड खाण्याची इच्छा होते? मग एकदा ट्राय करा हेल्दी बीटरूट बर्फी

Shreya Maskar

बीटरूट बर्फी

बीटरूट बर्फी बनवण्यासाठी बीट, रवा, साखर, तूप, दूध, वेलची पूड, सुकामेवा इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार साहित्य टाकू शकता.

Beetroot Barfi | yandex

रवा

बीटरूट बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रवा घालून हलक्या आचेवर छान भाजून घ्या. यासाठी बारीक रवा निवडा.

Semolina | yandex

गोल्डन फ्राय करा

रवा गुलाबी झाला की छान सुगंध येऊ लागतो. मग त्यात किसलेले बीट घाला आणि 4-5 मिनिटे चांगले परतून घ्या. मिश्रण पॅनला चिकटणार नाही, याची काळजी घ्या.

Beetroot Barfi | yandex

दूध

बीट शिजायला लागेल की, त्यात पाणी आणि दूध मिक्स करा. या रेसिपीसाठी घट्ट दूध वापरा. मिश्रण थोडे आटवू‌न घ्या.

Milk | yandex

साखर

मग यात आवडीनुसार साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण थोडे पातळ होते. तुम्ही यात साखरे ऐवजी गूळ देखील टाकू शकता. गूळ अधिक पौष्टिक आहे.

Sugar | yandex

सुकामेवा

शेवटी गॅस बंद करून त्यात वेलची पूड आणि सुकामेवा घाला. तुम्ही ड्रायफ्रूट्स आधी तुपात चांगले परतू शकता.

Dried fruits | yandex

बर्फी

आता एका ताटाला हलके तूप लावून सर्व मिश्रण त्यात पसरवून घ्या. ही बर्फी फ्रिजमध्ये ७-८ तास सेट करायला ठेवा. जेणेकरून ती चवीला चांगली बनले.

Beetroot Barfi | yandex

स्टोर करा

त्यानंतर बीटरूट बर्फी एअरटाइट डब्यात ठेवून द्या. ती ३ ते ४ दिवस फ्रिजमध्ये चांगली टिकते. घरी पाहुणे आल्यावर त्यांना ही नक्की द्या, सर्वजण तुमचे कौतुक करतील.

Beetroot Barfi | yandex

NEXT : चटपटीत चिवडा खा अन् वजन कमी करा, वाचा डाएट रेसिपी

Diet Chivda Recipe | yandex
येथे क्लिक करा...