Diet Chivda Recipe : चटपटीत चिवडा खा अन् वजन कमी करा, वाचा डाएट रेसिपी

Shreya Maskar

डाएट चिवडा

डाएट चिवडा बनवण्यासाठी मुरमुरे, शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरी, सुकं खोबरं, जिरे, मीठ, हळद, लाल तिखट इत्यादी साहित्य लागते.

Diet Chivda | yandex

शेंगदाणे

डाएट चिवडा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये शेंगदाणे परतून घ्या. शेंगदाणे छान परतल्यावर त्यात सुक्या खोबऱ्याचे पातळ काप परतून घ्या.

Peanuts | yandex

खोबरे

शेंगदाणे आणि खोबरे परतून झाल्यावर एका ताटात काढून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये जिरे, मोहरी,कढीपत्ता मिक्स करा.

Coconut | yandex

मीठ

मग त्यात हळद आणि चवीपुरता मीठ घाला. थोड्या वेळाने गॅस बंद करून त्यात मुरमुरे, शेंगदाणे आणि भाजलेले सुकं खोबरं मिक्स करा.

salt | yandex

लाल तिखट

पुढे मिश्रणात लाल तिखट, चाट मसाला मिक्स करा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.

Red chili powder | yandex

सुकामेवा

शेवटी तुपात परतलेला सुकामेवा यात मिक्स करा. तसेच लसूण देखील परतून घ्या. लसूण गोल्डन फ्राय करा.

Dried fruits | yandex

मखाना

तुम्ही यात भाजलेले मखाना आणि भाजलेली डाळ देखील टाकू शकता. तयार भेळ हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवून द्या.

Makhana | yandex

मुरमुरे पोषक घटक

मुरमुरे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण यात कॅलरीज खूप कमी असतात आणि पचायला हलके असतात. तसेच त्यात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.

Diet Chivda | yandex

NEXT : महाशिवरात्रीला उपवासाला बनवा मऊसूत राजगिऱ्याचा शिरा, तोंडात टाकताच विरघळेल

Mahashivratri 2026 | yandex
येथे क्लिक करा...