Shreya Maskar
यंदा 15 फेब्रुवारी 2026 (रविवारी) महाशिवरात्री आली आहे. महाशिवरात्रीच्या उपवासाला घरीच बनवलेले पदार्थ खा. तुम्ही नाश्त्याला राजगिऱ्याचा शिरा बनवा.
राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी राजगिऱ्याचे पीठ, गरम पाणी, तूप, साखर, वेलची पूड, ड्रायफ्रुटस आणि बारीक रवा इत्यादी साहित्य लागते.
राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून व्यवस्थित वितळवून गरम करून घ्यावे. गॅस कमी आचेवर ठेवा.
तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात राजगिऱ्याचे पीठ परतून घ्या. पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर यात गरम पाणी ओतावे. गरम पाणी ओतल्यावर ते सतत ढवळत राहा.
आता यात रवा, साखर, वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. सगळ्यात शेवटी यात आपल्या आवडत्या ड्रायफ्रुटसचे काप घालावेत.
५-१० मिनिटे शिरा चांगला शिजवून घ्या. त्यानंतर उपवासाच्या राजगिऱ्याच्या शिऱ्याचा आस्वाद घ्या. अवघ्या ५-१० मिनिटांत राजगिऱ्याचा शिरा तयार होईल.
राजगिरा हा प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असलेला एक अत्यंत पौष्टिक, ग्लूटेन-मुक्त सुपरफूड आहे. उपवासाला हे प्रामुख्याने खातात.
राजगिरा वजन कमी करण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करतो.