Shreya Maskar
रविवारी काही तरी वेगळे आणि चमचमीत खावेसे वाटत असेल तर काश्मिरी पुलाव बनवा. रेस्टॉरंट स्टाइल चव अगदी घरी येऊ शकते. घरातील सर्वजण आवडीने खातील.
काश्मिरी पुलाव बनवण्यासाठी तांदूळ, दूध, सुका मेवा, क्रीम, जिरे, साखर, तूप, वेलची, तमालपत्र, खडे मसाले, लवंग, दालचिनी आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
काश्मिरी पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधामध्ये क्रीम, साखर घालून चांगले मिक्स करावे. यांचे योग्य प्रमाण घ्या.
त्यानंतर पॅनमध्ये तूप टाकून त्यात जिरे, दालचिनी, खडे मसाले, तमालपत्र, लवंग, वेलची घालून खरपूस भाजून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा.
त्यानंतर यात स्वच्छ धुतलेले बासमती तांदूळ घालून ७-८ मिनिटे एक उकळी काढून घ्या. नंतर यामध्ये दुधाचे मिश्रण आणि पाणी टाका.
काश्मिरी पुलाव 10 ते 15 मिनिटे शिजू द्यावे. त्यानंतर तुम्ही यात बारीक ड्रायफ्रुट्सचे काप टाका. तुम्ही ड्रायफ्रुट्स तुपात परतून घेऊ शकता.
काश्मिरी पुलाव बनवताना तुम्ही यात इतर काही पदार्थ देखील टाकू शकता. उदा. केशर, हिरव्या भाज्या, बटाटे, पनीर
थंडगार रायता, कुरकुरीत पापड, आंबट-गोड लोणच्यासोबत काश्मिरी पुलावचा आस्वाद घ्या. एक घास खातच काश्मीरची आठवण येईल.