Shreya Maskar
बदाम हा पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोज सकाळी याचे सेवन करावे.
बदामाचे सर्वात जास्त गोड पदार्थ बनतात. यात बदाम कतली, बदाम पाक, बदाम शेक, बदाम हलवा, बदाम स्मूदी यांचा समावेश असतो. मात्र आज तुम्ही चटपटीत बदामाची चटणी बनवा.
बदाम चटणी बनवण्यासाठी बदाम, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, लिंबाचा रस, साखर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात काही दाणे शेंगदाणे देखील टाकू शकता.
बदाम चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बदाम थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर बदामाची सालं काढून घ्या.
त्यानंतर सोललेले बदाम, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, लिंबाचा रस, साखर आणि मीठ मिक्सरला वाटून घ्या. पेस्ट जास्त पातळ किंवा घट्ट करू नका.
त्यानंतर छोट्या पॅनमध्ये तेल, कढिपत्ता, हिरवी मिरची, जिरे, हळद टाकून फोडणी तयार करा आणि ती चटणीवर टाका. त्यानंतर चटणी छान मिक्स करा.
शेवटी चटणीनर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून सजवा. गरमागरम बदाम चटणीचा तुम्ही चपाती किंवा भातासोबत आस्वाद घ्या.
तुम्ही हवाबंद डब्यात बदाम चटणी स्टोर करा. १-२ दिवस बदाम चटणी चांगली राहते. चटणी करताना एकाच वेळी जास्त प्रमाणात करू नये.