Shreya Maskar
सांबार वडी प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात, विशेषतः नागपूर आणि अमरावती परिसरात बनवली जाते. हा पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे.
सांबार वडीचे सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये खसखस, तीळ, जिरे, धणे, बडीशेप आणि सुकं खोबरे खरपूस भाजून घ्या.
यात आल्या-लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, मसाले (हळद, लाल तिखट), चिंचेचा कोळ, गूळ आणि कोथिंबीर घालून मिश्रण परतून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात भाजलेले बेसन घालून एकत्र करा. तयार मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
कणीक बनवण्यासाठी परातीत बेसन, पीठ, मैदा मिक्स करा. यात मीठ आणि तेलाचे मोहन टाकून मऊ कणिक मळून घ्या. पीठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात तयार सारण भरा.
आता सांबार वडीचे टोक बंद करा आणि तेलात सांबार वडी खरपूस भाजून घ्या. सांबार वडी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा.
सांबार वडी पुदिना चटणी किंवा सॉस सोबत खा. संध्याकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ नक्की बनवा. लहान मुलं आवडीने खातील.
सांबार वडी ही एखाद्या पुडक्याच्या आकाराची असते, म्हणून तिला 'पुडाची वडी' असेही म्हणतात.