Shreya Maskar
पालक वडी बनवण्यासाठी पालक, बेसन, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, हळद, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
पालक वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. पालक हिवाळ्यात आवर्जून खा. याने शरीराला खूप पोषण मिळते.
एका बाऊलमध्ये चिरलेला पालक, बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट टाकून मिश्रण एकजीव करा.
त्यानंतर यात तीळ, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले देखील टाकू शकता.
त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. आता पीठाचे लांब रोल्स करा. एका ताटाला तेल लावून त्यावर हा रोल्स ठेवा. कुकरमध्ये २०-२५ मिनिटांसाठी वड्या वाफवून घ्या.
पालक रोलच्या वड्या पाडून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वड्या खरपूस भाजून घ्या. लक्षात ठेवा पालक वडी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.
कुरकरीत पालक वडीचा पुदिन्याच्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचपसबोत आस्वाद घ्या. संध्याकाळी चहासोबत नाश्त्याला हा पदार्थ खूपच भन्नाट लागले.
पालक ही हिरवी पालेभाजी आहे. यात लोह, फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पचनशक्ती उत्तम ठेवण्यास मदत करते.डोळ्यांचे आरोग्य सुधारते.