Paneer Ghotala Recipe : सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी बनवा पनीर घोटाळा, पोषण मिळेल अन् वेळही वाचेल

Shreya Maskar

पनीर

पनीरमध्ये खूप प्रोटीन असते. जे शरीराला पोषण देण्यास खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे रोजच्या जेवणात पनीरचा समावेश करा.

Paneer | yandex

पनीर घोटाळा

पनीर घोटाळा बनवण्यासाठी पनीर, चीज, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, आलं-लसूण-मिरची पेस्ट, पावभाजी मसाला, चाट मसाला, तिखट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Paneer Ghotala | yandex

फोडणी

पनीर घोटाळा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद घालून फोडणी चांगली तडतडू द्या.

Paneer Ghotala | yandex

कांदा

यानंतर यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची- आलं- लसूण पेस्ट घालून परतून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवून द्या.

Onion | yandex

शिमला मिरची

त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिरची मिक्स करा. तुम्ही यात थोडे चिली फेक्स देखील टाकू शकता.

Bell Pepper | yandex

मीठ

छान मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात पाणी टाकून भाज्या वाफवून घ्या. त्यानंतर त्यात खडे मसाले, मीठ घालून भाज्या मॅश करून घ्या.

Salt | yandex

चीज

शेवटी यात किसलेले पनीर, चीज आणि थोडे पाणी घालून मिक्स करा. ५-६ मिनिटे मंद आचेवर पनीर घोटाळा शिजवून घ्या.

Cheese | yandex

टीप

पनीर घोटाळा बनवण्यासाठी खूप फ्रेश पनीर खरेदी करा. जेणेकरून तुम्हाला हेल्दी पदार्थ खाता येईल.

Paneer Ghotala | yandex

NEXT : काळ्या गाजराचा हलवा कधी खाल्लात का? वाचा राजस्थानी स्पेशल रेसिपी

Black Carrot Halwa Recipe | google
येथे क्लिक करा...