Black Carrot Halwa Recipe : काळ्या गाजराचा हलवा कधी खाल्लात का? वाचा राजस्थानी स्पेशल रेसिपी

Shreya Maskar

राजस्थान

काळ्या गाजराचा हलवा हा हिवाळ्यातील एक उत्कृष्ट आणि पौष्टिक राजस्थानी-उत्तर भारतीय गोड पदार्थ आहे.

Black Carrot Halwa | google

काळ्या गाजराचा हलवा

काळ्या गाजराचा हलवा बनवण्यासाठी काळे गाजर, दूध, साखर , देशी तूप, मावा, वेलची पूड, काजू, बदाम, मनुका इत्यादी साहित्य लागते.

Black Carrot | google

दूध

काळ्या गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेला गाजर आणि दूध घालून शिजवा.  

Milk | yandex

सुकामेवा

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात साखर, खवा मिक्स करा. त्यानंतर हलवा सतत ढवळत राहा, जेणेकरून तो पॅनला चिकटणार नाही.

Dry Fruits | yandex

साखर

साखर विरघळल्यानंतर हलव्यात वेलची पूड, सुंठ पूड घालून नीट एकजीव करा. त्यामुळे चव आणि सुगंध अधिक वाढेल.

Sugar | yandex

काजू

खवा चांगला परतल्यावर यात चिरलेले काजू, बदाम आणि मनुक्याचे तुकडे मिक्स करा. १०-१५ मिनिटांनी गॅस बंद करा आणि काळ्या गाजराचा हलव्याचा आस्वाद घ्या.

Cashews | yandex

पोषक घटक

काळ्या गाजरात अँटीऑक्सिडंट्स, आयर्न आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Black Carrot | google

रक्ताची कमतरता

काळा गाजर रक्ताची कमतरता दूर करण्यास, पचनसंस्था मजबूत ठेवण्यास आणि हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते.

Black Carrot Halwa | google

NEXT : रविवारी जेवणाचे टेन्शन विसरा; अवघ्या १०-१५ मिनिटांत बनवा चमचमीत मसूर पुलाव

Masoor Pulao Recipe | yandex
येथे क्लिक करा...