Shreya Maskar
मसूर पुलाव बनवण्यासाठी मसूर डाळ, बासमती तांदूळ, पाणी, खडे मसाले, शेंगदाणे, काजू, हिरव्या भाज्या, तूप, जिरे, लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, लिंबू, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला आणि आलं-लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.
मसूर पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीभर मसूर डाळ आणि बासमती तांदूळ चांगले धुवून कुकरमध्ये चांगले शिजवून घ्या. यांच्यासोबत कच्चे शेंगदाणे देखील कुकरला लावा.
आता पॅनमध्ये तूप टाकून त्यात खडे मसाले, जिरे, लसूण, हिरवी मिरची हळद, लाल तिखट आणि आलं-लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्या. मसाल्याला तेल सुटू लागले की, त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाका.
त्यानंतर तुमच्या आवडीनुसार हिरव्या भाज्या छान बारीक कापून मिश्रणात मिक्स करा आणि एक उकळी काढून घ्या.
त्यानंतर मिश्रणात उकडलेले शेंगदाणे, तुपात परतलेले काजू, गरम मसाला, मीठ आणि आलं-लसूण पेस्ट टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. गॅस कमी आचेवर ठेवून द्या.
आता मिश्रणात थोडे पाणी टाकून त्यात उकडलेली मसूर डाळ आणि बासमती भात टाका आणि मस्त एकत्र करा. सर्व ठिकाणी मसाला लागला पाहिजे.
शेवटी लिंबाचा रस पिळा आणि हिरवी गार कोथिंबीर टाकून भात 5-10 मिनिटे कमी आचेवर शिजवून घ्या.
गरमा गरम मसूर पुलावचा रायता, पापड, लोणचे यांच्यासोबत आस्वाद घ्या. तसेच तुम्ही वरून तूप देखीस सोडू शकता. अशाप्रकारे चटपटीत संडे स्पेशल मेन्यू तयार झाला.