Konkan Food : कोकण स्पेशल 'वाटपाची डाळ', चाखाल अस्सल गावरान चव

Shreya Maskar

कोकण स्पेशल

कोकणात प्रामुख्याने सणासुदीला 'वाटपाची डाळ' बनवली जाते. ही पारंपरिक रेसिपी खायला खूपच चवदार आहे. तसेच जेवणाची रंगत वाढवते.

Konkan Food | yandex

वाटपाची डाळ

कोकण स्पेशल वाटपाचे वरण बनवण्यासाठी ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं, कांदा, हिरवी मिरची, तेल, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, तुरीची डाळ, पाणी, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Konkan Food | yandex

तुरीची डाळ

कोकण स्पेशल वाटपाची डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम तुरीची डाळ शिजवून घ्या. थोडी पातळ करून घ्या.

Konkan Food | yandex

हिरवी मिरची

मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, जिरं, हिरव्या मिरची,कोथिंबीर, खोबरे आणि पाणी टाकून घट्टसर पेस्ट बनवून घ्या.

Green Chilli | yandex

मोहरी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद घालून चांगली फोडणी द्या.

Mustard | yandex

वाटण

फोडणी छान परतली की त्यात वाटण घाला. यात पाणी टाकून एक उकळी काढून घ्या.

Konkan Food | yandex

शिजवलेली तुरडाळ

डाळ छान उकळल्यावर त्यात शिजवलेली तुरडाळ मिक्स करा. तुम्ही यात उकडलेले बटाटे देखील टाकू शकता. यामुळे डाळीची चव वाढते.

Konkan Food | yandex

तूप

वाटपाची डाळीला छान उकळी आली की वरून त्यात तूप टाका. गरमागरम भातासोबत वाटपाच्या वरणाचा आस्वाद घ्या.

Ghee | yandex

NEXT : बटाट्याला द्या पंजाबी तडका, नाश्त्याला बनवा आलू पराठा

Aloo Paratha Recipe | yandex
येथे क्लिक करा...