Aloo Paratha Recipe : बटाट्याला द्या पंजाबी तडका, नाश्त्याला बनवा आलू पराठा

Shreya Maskar

आलू पराठा

पंजाबी स्टाइल आलू पराठा बनवण्यासाठी मैदा, उकडलेले बटाटे, कांदा, लसूण पेस्ट, कोथिंबीर, धना-जिरे पावडर, लाल तिखट, तूप आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Aloo Paratha | yandex

मैदा

आलू पराठा बनवण्यासाठी मैद्याची चांगली कणिक मळून घ्या. त्यासाठी बाऊलमध्ये मैदा, तेल आणि मीठ मिक्स करा. पीठ मऊ असू दे.

Flour | yandex

तेल

मळलेल्या पीठाला थोडे तेल लावून १०- १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या. यामुळे पराठे मऊ आणि खुसखुशीत होतील.

Oil | yandex

बटाटे

बटाट्याचा मसाला तयार करण्यासाठी बाऊलमध्ये उकडलेले बटाटे चांगले स्मॅश करा. यात कांदा, लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद आणि इतर मसाले घालून मिश्रण छान एकजीव करा.

Potatoes | yandex

मीठ

शेवटी यात चवीनुसार मीठ घाला. आता मैद्याच्या पिठाचे छोटे गोळे करून त्यांची पारी करा.

Salt | yandex

मैद्याच्या पारी

मैद्याच्या पारीमध्ये बटाट्याचा मसाला भरून पराठे लाटून घ्या. सारण जास्त भरू नका. नाहीतर पराठा फुटेल.

Aloo Paratha | yandex

तूप

पॅनमध्ये तूप टाकून आलू पराठा दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय करा. तुपात आलू पराठा खूपच चवदार बनतो.

Ghee | yandex

दही

दहीसोबत आलू पराठ्याचा आस्वाद घ्या. पंजाबी स्टाइल आलू पराठा तुमची सकाळची भूक भागवेल. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

Curd | yandex

NEXT : हिवाळ्यात आवर्जून बनवा भोपळ्याचा 'हा' चटपटीत पदार्थ, संध्याकाळच्या चहाची रंगत वाढेल

Bhopla Recipe | yandex
येथे क्लिक करा...