Shreya Maskar
हिवाळ्यात चटपटीत खावेसे वाटत असेल तर भोपळ्याचे पकोडे बनवा. हा पदार्थ गरमागरम चहासोबत चांगला लागेल.
भोपळ्याचे पकोडे बनवण्यासाठी तुम्ही दुधा भोपळा आणि लाल भोपळा या दोघांचाही वापर करू शकता. नाश्त्यासाठी हा चटपटीत पदार्थ आहे.
भोपळ्याचे पकोडे बनवण्यासाठी किसलेला लाल भोपळा, बेसन पीठ, लसूण, जिरे, ओवा, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, हळद, तेल इत्यादी साहित्य लागते.
भोपळ्याचे पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल भोपळा किसून घ्या. तुम्ही तो कुकरला एक शिट्टी देऊन शिजवू देखील शकता.
एका बाऊलमध्ये लसूण पेस्ट, जिरे, ओवा, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट आणि हळद घालून चांगले एकत्र करा.
यात आता किसलेला भोपळा आणि बेसन टाकून मिश्रण छान एकजीव करून घ्या. मिश्रण जास्त घट्ट आणि पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून वडे थापून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पकोडे गोल्डन फ्राय करा.
कुरकुरीत भोपळ्याचे पकोडे पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत खा. हा पदार्थ घरी १०- १५ मिनिटांत बनवता येतो. तसेच पोट देखील भरते.