Shreya Maskar
पानगी बनवण्यासाठी तांदळाच्या पीठात मीठ आणि पाणी घालून भिजवून घ्या. पानगी हा गोड पदार्थ कोकणात सणासुदीला प्रामुख्याने बनवला जातो.
त्यानंतर एका बाऊलमध्ये नारळाचा चव काढून घ्या. यात वेलची पूड घालून मिक्स करा.
तुम्ही यात साखर किंवा गूळ दोघांपैकी काही घालू शकता. तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण ठरवा.
त्यानंतर केळीच्या पानांचे लहान तुकडे करून ते स्वच्छ धुवून पुसून घ्या. जास्तपण छोटे तुकडे करू नका, नाहीतर मिश्रण बाहेर येईल.
गॅसवर तवा ठेवून त्यात शुद्ध तूप टाका. त्यानंतर केळीचे पान पसरवा. त्यावर तांदळाचे पीठ पसरवून त्यात खोबऱ्याचे सारण पसरवून पुन्हा थोडे तांदळाचे पीठ पसरवून केळीचे पान बंद करा.
गॅस मंद आचेवर ठेवून केळीची पाने खरपूस भाजा. छान सुगंध येऊ लागला की गॅस बंद करून पानगी एका ताटात काढून घ्या.
गरमागरम पानगीवर तूप, किसलेले खोबरं छान भुरभुरवा आणि नारळाच्या दुधासोबत पानगीचा आस्वाद घ्या.
केळीच्या पानाचा स्वाद लागल्याने या पानगी खायला अतिशय चविष्ट लागते. तसेच त्याची चव देखील वाढते.