चंद्रग्रहणाचं सूतक ठरलं काळ! स्नानासाठी गेलेल्या ६ चिमुरड्यांचा वेदनादायी अंत; वाचा नेमकं काय घडलं?

six children drowned after lunar eclipse : बिहारमधील चंपारण जिल्ह्यात चंद्रग्रहणानंतर नदीत स्नानासाठी गेलेल्या सहा मुलांचा बुडून मृत्यू झाला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण खोल पाण्यात अडकले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
drowning
drowning Saam Digital
Published On

चंद्रग्रहणाचे सूतक संपल्यानंतर नदीत स्नानासाठी गेलेल्या ६ चिमुकल्यांवर काळाने झडप घातली आहे. बिहारमध्ये घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळत आहे. एकाच वेळी ६ मुलांचा जीव गेल्याने कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली. ग्रहणानंतर रघवा नदीत स्नान करण्यासाठी गेल्यानंतर काळाने घाला घातला.

ग्रहण संपल्यानंतर ६ जण राघवा नदीत आंघोळीलाठी गेले होते. पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे एकजण बुडायला लागला. खोल पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवण्याचा एकमेकांचे हात धरून सर्व मुलांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा वेग जास्त होता, त्यामुळे सर्वजण मृत्यूच्या भोवऱ्यात अडकले. मृतांमध्ये तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. होळीच्या निमित्ताने या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

drowning
Fact Check : इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा हल्ल्यात मृत्यू? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर

दीक्षा कुमारी (१२), सोनाक्षी (९), प्रिया कुमारी (६), प्रिन्स कुमार (११) आणि मुलगी छोटी कुमारी (८) आणि सोनाली कुमारी (१२) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या निष्पाप मुलांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चंद्रग्रहणानंतर आंघोळ करताना मुले बुडून मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांच्या सुरूवातीच्या रिपोर्टमधून समोर आलेले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

drowning
Mosaic Strategy : इराणची तिहेरी रणनिती, मदतीला मित्रदेशांचे ५ लाख सैनिक; अमेरिकेला घाम, मोझॅक स्ट्रॅटेजी काय आहे?

मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व मुले नदीत आंघोळ करण्यासाठी गेली होती. आंघोळ करत असताना अचानक एका मुलगा खोल पाण्यात बुडयला लागला होता. त्याला बुडताना पाहून इतर पाच मुलांनी हात धरून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तेही खोल पाण्यात बुडाले. शेजारीच असणाऱ्यांना याबाबत समजले, त्यांनी वाचवण्यासाठी नदीकडे धाव घेतली. तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. सर्वजण पाण्यात वाहून गेले होते. तात्काळ बचाव पथकांनी धाव घेतली. पण एकालाही वाचवण्यात यश आले नाही. सहाही मुलांचे मृतदेह गावात पोहचताच एक आक्रोश झाला.

drowning
US Iran conflict : अमेरिकेविरोधात इस्लामिक राष्ट्रे एकवटली, इफ्तार पार्टीत ट्रम्प यांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com