US Iran conflict : अमेरिकेविरोधात इस्लामिक राष्ट्रे एकवटली, इफ्तार पार्टीत ट्रम्प यांना इशारा

Turkey Iran relations latest news : इराणवरील अमेरिकन हल्ल्यांनंतर इस्लामिक राष्ट्रांनी एकजूट दाखवली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला असून मलेशिया व इतर देशांनीही कठोर भूमिका घेतली आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक पातळीवर नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे आहेत.
US Middle East policy update
US Middle East policy updateSaam TV
Published On

US Middle East policy update : इराणवर अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे आता इस्लामिक राष्ट्र एकत्र आलेत... अमेरिकेविरोधात इस्लामिक राष्ट्रांनी नेमकी काय भूमिका घेतलीय? अमेरिकेची दादागिरी मोडण्यासाठी काय प्लॅन आखण्यात आलाय? पाहूयात या रिपोर्टमधून...

मध्य पूर्वेतील रणसंग्राम आता निर्णायक वळणावर पोहचलाय. अमेरिकेची दादागिरी मोडून काढण्यासाठी इस्लामिक जगताने अमेरिकेविरोधात शड्डू ठोकलाय. खामेनींच्या हत्येनंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी अंकारा येथील इफ्तार पार्टीत अमेरिकेला थेट इशारा देत. इस्लामिक राष्ट्रांना अमेरिकेविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलयं...

तुर्की इराणवरील हल्ल्याचा निषेध करते

अमेरिकेचा इराणवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन

इराणवरील हल्ले थांबवले नाही तर त्यांचे प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील

तुर्की शांततेच्या बाजूने ठाम उभे असून आम्हाला कायमस्वरुपी शांतता हवी आहे

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची प्रक्षोभक कृती युद्धाला जबाबदार

आखातातील युद्ध थांबवण्यासाठी इस्लामिक राष्ट्रांनी एकत्र यावे

दुसरीकडे इराणला पाठिंबा दिला म्हणून आमच्या देशात तख्तापालट करण्याचं षडयंत्र रचलं जातयं, असा दावा मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहीम यांनी केलाय...

US Middle East policy update
Mosaic Strategy : इराणची तिहेरी रणनिती, मदतीला मित्रदेशांचे ५ लाख सैनिक; अमेरिकेला घाम, मोझॅक स्ट्रॅटेजी काय आहे?

अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर वारंवार हल्ले होत असताना स्पेननेही अमेरिकेला इशारा दिलाय... 15 अमेरिकन विमान परत देत इराणवरील हल्ल्याविरोधात स्पेनने कठोर भूमिका घेतलीय. त्यामुळे एकीकडे इस्लामिक राष्ट्रांसह अमेरिकेविरोधात भविष्यात आणखी किती देश एकवटतात याकडे जगाचं लक्ष लागलयं...

US Middle East policy update
३० रणरागिणींनी चालवलं फायटर जेट; इराणच्या लष्करी तळांची केली राखरांगोळी, व्हिडिओ पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com