mumbai indian ipl 2025 x
Sports

Mi Vs GT : गुजरातला Eliminator मध्ये हरवलं तरीही IPL 2025 जिंकण्यापासून मुंबई राहणार दूर? आकडेवारीने टेन्शन वाढवलं

Mi Vs GT IPL 2025 Eliminator : मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो पंजाब किंग्स विरुद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळताना दिसेल.

Yash Shirke

IPL 2025 मधील एलिमिनेट सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये मुल्लानपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो पंजाबसोबत क्वालिफायर २ मध्ये खेळले. ज्या संघाचा पराजय होईल, त्या संघाचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. यामुळे आजचा सामना मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला काही सामने गमावल्यानंतर मुंबईने दमदार कमबॅक केले. पण कमबॅकनंतरच्या गुजरात आणि पंजाब यांच्याकडून झालेल्या पराभवाचा फटका मुंबईला बसला. मुंबईने प्लेऑफमध्ये सर्वात शेवटी प्रवेश केला. पॉईंट्स टेबलवर चौथे स्थान मिळवले.

आयपीएल २०२५ मध्ये सर्वात शेवटी क्वालिफायर करणारा चौथा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. आज (३० मे) मुंबई आणि गुजरात यांच्या एलिमिनेटर सामना रंगणार आहे. आयपीएल आणि मुंबईचा इतिहास पाहता एलिमिनेटर सामना खेळणे मुंबईसाठी धोकादायक आहे. ज्या-ज्या वर्षी मुंबईने एलिमिनेटर सामना खेळला आहे, त्या-त्या वर्षी मुंबईला आयपीएलच्या ट्रॉफीपासून दूर राहावे लागले आहे.

२०११ मध्ये मुंबई हा क्वालिफाय करणारा तिसरा संघ होता. त्यावर्षी एलिमिनेटरमध्ये मुंबईने कोलकाताचा पराभव केला. पण मुंबईला ट्रॉफी जिंकता आली नाही. तीच पुनरावृत्ती आयपीएल २०१२ मध्येही झाली. मुंबई पुन्हा पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानी होती, यावेळेसही मुंबई इंडियन्सला विजेतेपद कमावता आले नव्हते. २०१३ मध्ये मुंबईने पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली, तेव्हा मुंबई टॉप २ मध्ये होती. आयपीएल २०१४ मध्ये क्वालिफाय होणारा चौथा संघ मुंबईचा होता. तेव्हाही मुंबई ट्रॉफीपासून दूर राहिली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुंबईने एलिमिनेटर सामने खेळला आहे, तेव्हा-तेव्हा आयपीएलची ट्रॉफी दुसऱ्याच संघाने उचलली आहे, अशी आकडेवारी सांगते. पण २०२५ मध्ये ट्रॉफी जिंकून मुंबई आकडेवारी फोल ठरवेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१० पासून आयपीएलच्या पॉईंट्स टेबलवरचे मुंबई इंडियन्सचे स्थान

२०१० - पहिला क्रमांक (उपविजेते)

२०११ - तिसरा क्रमांक (दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराजय)

२०१२ - तिसरा क्रमांक (एलिमिनेटरमध्ये पराभूत

२०१३ - दुसरा क्रमांक (विजेते)

२०१४ - चौथा क्रमांक (एलिमिनेटरमध्ये पराजय)

२०१५ - दुसरा क्रमांक (विजेते)

२०१७ - पहिला क्रमांक (विजेते)

२०१९ - पहिला क्रमांक (विजेते)

२०२० - पहिला क्रमांक (विजेते)

२०२३ - चौथा क्रमांक (क्वालिफायर २ मध्ये पराजय)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT