
IPL 2025 च्या क्वालिफायर १ सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमने सामने आले. बंगळुरूने पंजाबवर ८ विकेट्सने विजय मिळवला आणि फायनलमधील जागा पक्की केली. नऊ वर्षांनी फायनलचे तिकीट मिळवल्याने बंगळुरूच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आरसीबीच्या 'इ साल कप नम दे' या स्वप्नाच्या आड फक्त एक सामना बाकी आहे.
सामना संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारशी संवाद साधण्यात आला. 'मी सर्वप्रथम आरसीबी फॅन्सचे आभार मानू इच्छितो. फक्त चिन्नास्वामी स्टेडियममध्येच नाही, तर आम्ही ज्या-ज्या ठिकाणी गेलो आम्हाला फॅन्सचं इतकं प्रेम मिळालं जणूकाही आम्ही घरच्या मैदानावर खेळत आहोत असं वाटलं. आमच्यावर असचं प्रेम करत राहा. फक्त एक सामना बाकी आहे, मग आपण सर्वजण एकत्र सेलिब्रेशन करु' असे रजत पाटीदार म्हणाला.
२०१६ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वात बंगळुरूचा संघ आयपीएल फायनलमध्ये गेला होता. आता नऊ वर्षांनी रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात संघाने फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. पंजाब विरुद्धचा क्वालिफायर १ सामन जिंकल्यानंतर विराटने फक्त १ सामना बाकी आहे म्हणत सेलिब्रेट केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सुयश शर्माने पंजाब विरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. ३ ओव्हर्समध्ये १७ धावा देत त्याने ३ विकेट्स घेतल्या. त्याला प्लेयर ऑफ द मॅन हा खिताब मिळाला. प्लेयर ऑफ द मॅनचा खिताब घेताना सुयशने देखील आपण सर्वजण ३ जून (आयपीएल फायनल) सेलिब्रेशन करु..तेव्हा ग्राँड सेलिब्रेशन असेल, असे म्हटले.
क्वालिफायर १ च्या पराभवानंतर पंजाब किंग्स १ जून रोजी क्वालिफायर २ चा सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा एलिमिनेटर सामना उद्या (३० मे) खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो पंजाब विरुद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळेल. जो संघ क्वालिफायर २ मध्ये जिंकेल तो संघ ३ मे रोजी फायनलमध्ये बंगळुरू विरुद्ध खेळताना दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.