SRH VS MI IPL 2025 X
Sports

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने अंपायरला विकत घेतलं? 'या' ३ निर्णयांवरुन उपस्थित केली जातेय शंका

IPL 2025 Mumbai Indians : हैदराबाद विरुद्ध मुंबई या सामन्यात इशान किशनच्या विकेटमुळे मोठा गोंधळ उडाला. या विकेट प्रकरणामुळे सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Yash Shirke

SRH VS MI : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यामध्ये इशान किशनच्या विकेटमुळे मोठा गोंधळ झाला. अपील होण्याआधीच इशानने क्रीज सोडली. रिप्लेमध्ये इशानच्या बॅटचा चेंडूशी संपर्क झाला नव्हता हे स्पष्ट झाले. इशान क्रीज सोडून जात असताना मुख्य अंपायर विनोद सेशन गोंधळले, पण लगेच त्यांनी आउटचा कॉल दिला. या एकूणच प्रकरणावरुन कालच्या सामन्यात फिक्सिंग झाली अशा चर्चा सुरु झाल्या. अंपायर विनोद सेशन यांच्यावरही आरोप होत आहेत.

इशान किशनच्या वादग्रस्त विकेटनंतर सोशल मीडियावर अंपायर विनोद सेशन यांच्या अंपायरिंगवर संशय व्यक्त केला जात आहे. विनोद सेशन यांनी मुंबईच्या बाजूने निकाल दिल्याची घटना नेटकऱ्यांनी अधोरेखित केल्या आहेत. या तीन घटनांमुळे अंपायर विनोद सेशन आणि मुंबई इंडियन्स यांच्यावर फिक्सिंगचा आरोप केला जात आहेत.

विनोद सेशन यांचे ३ वादग्रस्त निर्णय -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात विनोद सेशन यांनी एलबीडब्लूचा कॉल दिला होता. तेव्हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. रिव्ह्यू घेतल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात त्यांनी रोहित शर्माला एलबीडब्लूच्या अपीलला नॉटआउट घोषित केले होते. केएल राहुलच्या अपीलनंतर रिव्ह्यू घेण्यात आला. तेव्हा पुन्हा सेशन यांचा निर्णय बदलण्यात आला. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात इशान किशन आउट नव्हता, तरीही विनोद सेशन यांनी आउटचा कॉल दिला. या तीन घटनांमुळे विनोद सेशन यांच्यावर नेटकरी फिक्सिंगचा आरोप करत आहेत.

इशान किशनच्या विकेटमुळे आयपीएलच्या सामन्यात फिक्सिंगला सुरुवात झाल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. काहीजणांनी तर मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघातील खेळाडूंवर फिक्सिंगचे आरोप केले आहेत. या चर्चांमुळे आयपीएल २०२५ वर काही परिणाम तर नाही ना होणार अशी चिंता चाहत्यांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT