Jalgaon: महाराष्ट्र हादरला! ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसताना नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Jalgaon Crime News: जळगावमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalgaon News
Jalgaon Crime News Saam Tv
Published On

Summary -

  • जळगावमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

  • पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आली

  • पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

  • या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ

संजय महाजन, जळगाव

Jalgaon News: जळगावच्या एरंडोल येथे ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात करण्यात आला. लांडापुरा भिलाटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी घरातून अचानक गायब झाली. नातेवाईकाच्या घरी ही मुलगी संशयास्पद स्थितीत आढळून आली. या मुलीवर ५७ वर्षांच्या नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केला. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील केवडीपुरा येथील एक महिला आपल्या कुटुंबासह लांडापुरा भिलाटी परिसरात राहत आहे. मंगळवारी दुपारी सुमारास ती महिला घराजवळील शौचालयास गेली होती. त्यावेळी तिची तिन्ही लहान मुलं घरात खेळत होती. काही वेळानंतर ही महिला घरी परत आली. तिची ४ वर्षांची मुलगी घरात दिसून आली नाही. यामुळे महिलेने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.

Jalgaon News
Crime: ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंडात कापड टाकलं अन्...; विहिरीत फेकण्याचा प्रयत्न

दरम्यान शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याच्या घरातच संशयास्पद परिस्थितीमध्ये मुलगी दिसून आली. महिलेने या मुलीला तात्काळ आपल्या घरी आणले. नातेवाईकानेच आपल्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने महिलेला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Jalgaon News
Crime News : धक्कादायक! तीन दिवस बंदिस्त केलं, निर्जनस्थळी नेऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारासंदर्भातील गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास एरंडोल पोलिस करत आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली.

Jalgaon News
Pune Crime: स्कुटर थांबवली, धक्का देऊन खाली पाडलं अन्...! दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचं अपहरण, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com