पोलिस आयुक्त यांच्या स्वागताला चक्क पोलिस उपआयुक्त यांच्या कार्यालयाने रेड कार्पेट थाटले. पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले यांच्या कार्यालयाकडून हा तामझाम करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आज पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपआयुक्त परिमंडळ १ येथे वार्षिक तपासणीसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ ची वार्षिक तपासणी आज बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या शिवाय गुन्हे प्रतिबंध, तपास प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांवर बैठक झाली.
मात्र, या बैठकीनंतर शहरभर चर्चा तिथल्या तामझाम चीच जोरदार रंगली. तामझाम केलेल्या एक एक गोष्टीची पोलिस दलात चवीने याबाबत गप्पागोष्टी रंगल्या होत्या. संपूर्ण पोलिस ठाण्याचा परिसर रिकामा करण्यात आला, प्रोटोकॉल म्हणून त्यांना सलामी सुद्धा देण्यात आली. मात्र त्यानंतर व्हिडिओ मधील दृष्यांमध्ये रेड कार्पेट दिसून आले. हे सुरू असताना ड्रोन ने या सोहळ्याचे दृश्य टिपले.
एका बाजूला पुणे शहरात गुंडगिरी, ड्रग्स ची तस्करी, बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य, वाहतूक कोंडी असे जटिल प्रश्न पुणेकरांना भेडसावत असताना पोलिसांकडून पोलिस आयुक्तांच्या एका बैठकीला एवढा तामझाम गरजेचा आहे का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पोलिस आयुक्त आढावा घेण्यासाठी तसेच प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आले होते खरे मात्र दुसऱ्या बाजूला उपआयुक्त कार्यालय सरबराईत गुंग होते हे या व्हिडिओ मधून स्पष्ट झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.