Surabhi Jayashree Jagdish
घरात लावलेली कोथिंबीर अनेकदा लवकर सुकते. अनेकदा खूप उंच वाढते, पण पानं कमी येतात. कधी कधी नीट उगवतही नाही.
कोथिंबीरची थोडी काळजी घेतली आणि योग्य पद्धत वापरली तर ती छान वाढते. घरात धणे लावल्यास दाट, हिरवीगार आणि ताजी कोथिंबीर उगवू शकते. फक्त काही साध्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे.Scooter dicky video
Scooter dicky video
धणे हलके दाबून दोन भागांमध्ये फोडून घ्या. त्यानंतर हे बीज ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे बीज लवकर आणि समान पद्धतीने अंकुरते.
कोथिंबीरसाठी साधारण ६ ते ८ इंच खोल कुंडी योग्य ठरते. माती आणि कंपोस्ट यांचे १:१:१ प्रमाणात मिश्रण तयार करा. माती अशी असावी की, पाणी साचणार नाही आणि सहज निचरा होईल.
कोथिंबीरच्या चांगल्या वाढीसाठी रोज ३ ते ४ तास हलका सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पण दुपारच्या खूप तीव्र उन्हापासून रोपाचं संरक्षण करणं गरजेचं आहे.
माती नेहमी हलकी ओलसर ठेवणं महत्त्वाचं आहे. पण जास्त पाणी दिल्यास मातीमध्ये पाणी साचू शकतं. म्हणून रोज हलक्या स्प्रेने पाणी देणं अधिक फायदेशीर ठरतं.
लागवड केल्यानंतर साधारण २५ ते ३० दिवसांत पानं कापण्यासाठी तयार होतात. कोथिंबीर कापताना वरच्या बाजूने कापली पाहिजेत. मुळासकट काढू नये, त्यामुळे पुन्हा नवीन वाढ होण्यास मदत होते.