Manasvi Choudhary
आपण स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरचा वापर करतात. गॅस सिलेंडरसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत.
मात्र तुम्हाला माहितीये का? तुम्ही वापरत असलेला गॅस सिलेंडर लाल रंगाचाच का असतो?
LPG गॅस सिलेंडर हा आपल्याला गोलाकार आकारात आणि लाल रंगामध्येच दिसतो.
घरगुती गॅस सिलेंडर हे लाल रंगाचे असतात तर व्यवसायिक गॅस सिलेंडर हे निळ्या रंगाचे असतात.
एलपीजी गॅस ज्वलनशील आहे. गॅसला लगेच आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच एलपीजी हा धोकादायक असतो
लाल रंग धोक्याचे प्रतीक मानले जाते. हे सिलेंडर हाताळताना लोकांना सावध राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे.
गोल आकारामुळे सिलिंडर सहजरीत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते. याच कारणांमुळे सिलिंडरचा आकार गोल असतो.