
टीम इंडियाने टी-२०वर्ल्डकप जिंकला आहे. सुर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक उंचावला आहे. त्यानंतर सुर्यकुमार चांगलाच चर्चेत आला आहे.
सुर्यकुमार यादवची बायकोदेखील टीम इंडियाच्या सपोर्टसाठी गेली होती. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सुर्यकुमार यादवच्या बायकोचे नाव देविशा शेट्टी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
सुर्यकुमार यादव आणि देविशा यांची पहिली भेट २०१२ साली झाली होती. दोघे जवळपास ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी २९ मे २०१६ रोजी लग्नगाठ बांधली.
देविशा साउथ इंडियन आहे. सुर्यकुमार आणि देविशाची भेट मुंबईतील पोद्दार कॉलेजमध्ये झाली. यावेळी सुर्यकुमार २२ वर्षांचा होता.
सुर्यादादाने देविशाला डान्स करताना पाहिले होते. पहिल्याच नजरेत सुर्यकुमार यादवला देविशा आवडली होती.
यानंतर त्या दोघांची ओळख वाढली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
२०१२ ते २०१६ अशी चार वर्ष हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. सुर्यकुमार यादव आणि देविशा यांचे कॉलेजचे प्रेम ते लग्नापर्यंतचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.