मोठी बातमी! निधी वाटपात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

Mumbai Latest news : जिम्नॅशियमच्या कामावरून पालिका कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यावरून थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे.
bmc news
bmcSaam tv
Published On
Summary

कुलाब्यात जिम साहित्य प्रकरणात महापालिकेवर प्रश्नचिन्ह

काम पूर्ण होण्याआधीच बिल काढल्याची तक्रार

भ्रष्टाचाराच्या आरोपाने प्रशासनात खळबळ

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई कुलाबा परिसरातील सुंदर नगरी येथे उभारण्यात येणाऱ्या जिम्नॅशियमच्या कामावरून मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. श्री सप्त शृंगार भजन मंडळ (रजि.) या संस्थेने महापालिका आयुक्तांकडे पत्र पाठवून जिम साहित्य पुरवठा आणि बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाही पालिकेकडून बिल काढण्यात आल्याची गंभीर तक्रार केली आहे.

bmc news
मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

संस्थेच्या पत्रानुसार, ‘A’ विभागाकडून E-Tender Notice Bid No. 2025-MCGM-1233221-1 अंतर्गत सुंदर नगरी येथील श्री सप्त शृंगार भजन मंडळ परिसरात जिम्नॅशियम साहित्य पुरवठा व बसविण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामासाठी सुमारे 19 लाख 25 हजार 122 रुपये इतका खर्च मंजूर करण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत या ठिकाणी जिमचे साहित्य पुरवठा आणि बसविण्याचे काम सुरूच झाले नसल्याचे संस्थेने आपल्या तक्रारपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे परिसरातील युवक, महिला व नागरिकांना जिम सुविधेचा लाभ मिळत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.

याच संदर्भात संस्थेचे अध्यक्ष वरुण कुंदेल यांनी महापालिकेला दिलेल्या दुसऱ्या पत्रात अधिक गंभीर आरोप केला आहे. संबंधित कामासाठी Purchase Order काढण्यात आला असून त्यानंतरही जिम साहित्य प्रत्यक्षात उपलब्ध झालेले नाही, अशी बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे साहित्य नेमके कुठे गेले किंवा पुरवठा का झाला नाही, याबाबत संशय निर्माण होत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

bmc news
इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात; लेखिका भारंबेंच्या घरावर लावली 'स्पेशल' पाटी

तसेच काम पूर्ण होण्याआधीच पालिकेकडून बिल काढण्यात आल्याचा आरोपही संस्थेने केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि विभागीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच जिमचे साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी संस्थेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान या पत्रांच्या प्रती ‘A’ विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि M&E विभागाचे सहाय्यक अभियंता यांनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशी होते का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com