team india twitter
Sports

IND vs SL : श्रीलंकेत भारताची नाचक्की, २७ वर्षानंतर पहिल्यांदाच दारुण पराभव

India vs Sri Lanka, 3rd ODI Match Highlights: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४९ धावा करायच्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १३८ धावांवर आटोपला आहे. यासह भारतीय संघाने हा सामना ११० धावांनी गमावला असून ३ वनडे सामन्यांची मालिका २-० ने गमावली आहे. ाा

भारतीय संघासमोर २४९ धावांचं आव्हान

या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४९ धावांचं आव्हान होतं. पॉवरहाऊस भारतीय संघासाठी हे आव्हान तितकं मोठं नव्हतं. या सामन्यात भारतीय सलामी जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. शुभमन गिल १४ चेंडूत ६ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्माने २० चेंडूत ३५ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. विराट कोहलीकडून या सामन्यातही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो १८ चेंडूत २० धावा करात माघारी परतला.

मध्यक्रम पुन्हा एकदा फ्लॉप

या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा मध्यक्रम फ्लॉप ठरला आहे. या सामन्यात रिषभ पंत ९ चेंडूत अवघ्या ६ धावा करत माघारी परतला.त्यानंतर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर ७ चेंडूत ८ धावा करत तंबूत परतला. गेल्या दोन्ही सामन्यात शेवटी येऊन भारतीय संघाचा डाव सांभाळणारा अक्षर पटेल या सामन्यात मात्र मोठी खेळी करु शकला नाही. तो अवघ्या २ धावा करत माघारी परतला. तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या रियान परागने १५ तर शिवम दुबेने अवघ्या ९ धावा केल्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने मोलाच्या धावा केल्या. पण या धावा संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा नव्हत्या.

मालिकेतील तिन्ही सामन्यात श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांवर भारी पडले. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांच्या फिरकी गोलंदाजांच्या तालावर नाचताना दिसून आले. पहिला सामना बरोबरीत राहिल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाला तब्बल २७ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका गमवावी लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama: अशोक मामांच्या मालिकेत निवेदिता सराफांची एन्ट्री; २० वर्षांनंतर करणार एकत्र काम, पाहा पहिला प्रोमो…

Maharashtra Live News Update: सरकार सडलेला गहू आणि किडलेले तांदूळ शेतकऱ्यांना देतंय - उद्धव ठाकरे

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

SCROLL FOR NEXT