kangana Ranaut on vinesh Phogat : 'PM मोदींचा विरोध करूनही ऑलिम्पिकमध्ये...'; विनेश फोगाट जिंकल्यानंतर कंगना रणौत यांची पोस्ट चर्चेत

kangana ranaut News : विनेश फोगाट जिंकल्यानंतर कंगना रणौत यांची पोस्ट चर्चेत आहे. विनेश फोगाटच्या विजयानंतर कंगना रणौत यांनी विनेश फोगाट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं आहे.
'PM मोदींचा विरोध करूनही ऑलिम्पिकमध्ये...'; विनेश फोगाट जिंकल्यानंतर कंगना रणौत यांची पोस्ट चर्चेत
kangana Ranaut Saam tv
Published On

नवी दिल्ली : विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. विनेशने महिला ५० किलो वजनी गटाच्या उंपात्य फेरीत क्ब्यूबाच्या  युस्नेलीस गुजमानला धूळ चारत अंतिम फेरीत स्थान पक्के केले. विनेश ही ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला गटातून अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली खेळाडू ठरली आहे. विनेश फोगाट जिंकल्यानंतर दुसरीकडे खासदार कंगना रणौत यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

कंगना काय म्हणाल्या?

विनेश फोगाट जिंकल्यानंतर खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील भाजप खासदार कंगना रणौत यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरीत महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या वियजावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं की,'संपूर्ण भारत तिला पहिलं सुवर्ण पदक मिळो, अशी प्रार्थना करत आहे'.

'विनेश फोगाट एका आंदोलनात सहभागी झाली होती. पंतप्रधान मोदींना विरोध करूनही ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिला चांगलं प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि मार्गदर्शन मिळाली. हेच लोकशाही आणि एका चांगल्या नेतृत्वाचं सौंदर्य आहे, असेही त्या म्हणाल्या.

विनेशला सुवर्णपदक मिळणार का?

29 वर्षीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने मागील वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृज भूषण सिंह शरण यांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यांच्या विरोधात आंदोलन करताना विनेश ही कू्स्ती खेळापासून दूर होती. तरीही यंदा सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने धमाल केली आहे. यंदा विनेश पहिल्यांदा ५० किलो वजनी गटात खेळत आहे. याआधी विनेश ५३ किलो वजनी गटात खेळायची.

'PM मोदींचा विरोध करूनही ऑलिम्पिकमध्ये...'; विनेश फोगाट जिंकल्यानंतर कंगना रणौत यांची पोस्ट चर्चेत
Paris Olympic 2024: भारताला आज 2 सुवर्णपदकं मिळणार? विनेश फोगाट-अविनाश साबळेकडे सर्वांच्या नजरा; कसं असणार वेळापत्रक?

भारताचं चौथं पदक निश्चित

विनेशने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये धडक मारली आहे. विनेशच्या विजयाने भारताचं ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथं पदक निश्चित झालं आहे. या स्पर्धेत गुजमानचा ५-० ने पराभव केला आहे. विनेशने प्री क्वार्टर फायनलमध्ये युवी सुसाकीचा पराभव केला. या सामन्यात सुसाकी २-०ने आघाडीवर होती. मात्र, शेवटच्या मिनिटात विनेशने मुसंडी मारली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com