Vinesh Phogat Returned Arjuna Award: 'असा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये...', कुस्तीपटू विनेश फोगटने अर्जुन पुरस्कार सोडला कर्तव्य पथावर

Vinesh Phogat Arjuna Award News: कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आज महिला कुस्तीपटू विनेश फोगटनेही अर्जुन पुरस्कार परत केला आहे. पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात जात असताना पोलिसांनी विनेशला रोखले. त्यामुळे विनेशने आपला पुरस्कार कर्तव्य पथावर सोडून दिला.
Vinesh Phogat Returned Arjuna Award
Vinesh Phogat Returned Arjuna AwardSaam Digital
Published On

Vinesh Phogat Returned Arjuna Award

कुस्ती विश्वातील दंगल काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आज महिला कुस्तीपटू विनेश फोगटनेही अर्जुन पुरस्कार परत केला आहे. पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात जात असताना पोलिसांनी विनेशला रोखले. त्यामुळे विनेशने आपला पुरस्कार कर्तव्य पथावर सोडून दिला. नुकताच बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केला होता. असा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये, देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट परिस्थितीतून जात असल्याची खंत यावेळी विनेशने व्यक्त केली.

बजरंग पुनियाने 22 डिसेंबर रोजी पद्मश्री पुरस्कार करत केला होता. बजरंग पुनियाने पंदप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे पत्रही लिहिले होते. कुस्ती महासंघाच्या निवडीनंतर साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया () ची निवडणूक बृजभूषण शरण सिंग यांच्या जवळचे मानले जात असलेल्या संजय सिंग यांनी जिंकली होती. बृजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंचे शोशन केल्याचे आरोप असताना त्याच्या जवळचीच व्यक्तीची रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रमुख पदावर निवड झाल्यामुले विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक नाराज आहेत. बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर महिला असावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vinesh Phogat Returned Arjuna Award
Rajasthan Politics: भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, २२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, कोणाकडे कोणती जबाबदारी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com