Rajasthan Politics: भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, २२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, कोणाकडे कोणती जबाबदारी?

Rajasthan Politics News:राजस्थानमध्ये शनिवारी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या २२ जणांना शपथ दिली.
Rajasthan Politics
Rajasthan PoliticsSaam Digital
Published On

Rajasthan Politics

राजस्थानमध्ये शनिवारी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या २२ जणांना शपथ दिली. राज्यवर्धन राठोड, किरोरीलाल मीणा यांच्यासह गजेंद्र सिंह खिमसर, बाबुलाल खराडी, जोगाराम पटेल, जोराराम कुमावत, सुरेश सिंह आणि मदन दिलावर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये भाजपने ११५ जागा जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला ६९ जागांवर विजय मिळवता आला आहे. २०० पैकी १९९ जागांवर मतदान झाले होते. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निवडणुकीतील विजयानंतर भाजपने भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून सर्वांनाच चकीत करून सोडले होते. १५ डिसेंबरलाच त्यांनी शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan Politics
Narendra Modi: '२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा'; अयोध्येतून PM नरेंद्र मोदींचं आवाहन

या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून प्रादेशिक समतोल साधण्याची भाजपची रणनीती असेल. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतायेत. सध्या मध्य प्रदेशात लोकसभेच्या २९, राजस्थानमध्ये २५ आणि छत्तीसगडमध्ये ११ जागा आहेत. २०१८ मध्ये या तिन्ही राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपने ६५ पैकी ६१ जागा जिंकल्या होत्या. यावेळीही जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस भाजपचा असेल.

Rajasthan Politics
Indian Couple, Daughter Died In America: ३४ कोटींच्या अलिशान बंगल्यात मृतावस्थेत आढळलं भारतीय वंशाचं दाम्पत्य अन् मुलगी, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील घटनेने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com