Vinesh Phogat
Vinesh Phogat disqualification in olympics 2024@sportwalkmedia

Vinesh Phogat: सुवर्णपदकाची संधी हुकली, विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Wrestler Vinesh Phogat Disqualified From Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलंय. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, ते आपण जाणून घेवू या.
Published on

मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आलंय. विनेश ५० किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. आज तिचं ५० किलो गटात विनेशचं वजन थोडे जास्त असल्याचं दिसून आलं. विनेशला आता सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, मात्र आता तिचं रौप्यपदकही हुकल्याचं समोर आलंय. २९ वर्षीय विनेश ५० किलो कुस्तीमध्ये अपात्र ठरलीय. विनेशचं वजन थोडं वाढल्यामुळे तिला स्पर्धेसाठी अपात्र घोषित केलं गेलंय.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र

विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलंय, कारण तिचं वजन ५० किलोच्या मर्यादेशी जुळत नसल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने देखील याबाबतची माहिती दिलीय. भारतीय संघाने महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटच्या अपात्रतेचं वृ्त्त देणं, खेदकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. संघाने रात्रभर केलेल्या प्रयत्नांनंतरही (Indian Wrestler) आज सकाळी विनेश फोगटचं वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त होतं. अजून संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नसल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

वजन वाढलं...

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलमध्ये पोहोचल्यानंतर सुवर्णपदक जिंकेल, असा सर्वांना विश्वास होता. विनेशचा सामना फायनलमध्ये अमेरिकन कुस्तीपटूशी होणार होता. विनेश फोगाटने (Vinesh Phogat) मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा पराभव केला होता. विनेशची अंतिम स्पर्धा आज अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी होणार होती. यापूर्वी विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळा विश्वविजेती असलेली युई सुसाकीचा पराभव केला होता. सुवर्णपदकासाठी आज ७ ऑगस्ट रोजी स्पर्धा होणार (Indian Wrestler Vinesh Phogat) होती.

Vinesh Phogat
Vinesh Phogat Journey: हक्कासाठी WFI अध्यक्षांविरोधात लढली, आता पॅरिस गाजवलं, विनेश फोगाटचा संघर्षमय प्रवास!

विनेशची पुन्हा एकदा निराशा

कुस्तीपटू विनेश फोगाट जागतिक चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती आहे. तसेच विनेशने कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक देखील जिंकलेले (Paris Olympic 2024) आहे. पॅरिस ऑल्म्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंत विनेशचं मोठं स्वप्न तुटलं आहे. विनेशने रिओ २०२६ मध्ये महिलांच्या ४८ किलो फ्रीस्टाइल गटातून ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं होतं, तिथून तिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर टोकियो २०२० मध्ये महिलांच्या ५३ किलो गटात देखील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यानंतर तिला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आताही वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिचे वजन जास्त असल्याने पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशा पडली आहे.

Vinesh Phogat
kangana Ranaut on vinesh Phogat : 'PM मोदींचा विरोध करूनही ऑलिम्पिकमध्ये...'; विनेश फोगाट जिंकल्यानंतर कंगना रणौत यांची पोस्ट चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com