virat kohli  Saam tv
Sports

Ind vs Pak Highlights : विराटचे विक्रमी शतक, गोलंदाजाचा भेदक मारा; भारताच्या विजयाचे ५ शिल्पकार

Ind vs Pak Highlights News : पाकिस्तान विरोधात विराटने विक्रमी शतक ठोकले. तसेच गोलंदाजांनीही भेदक मारा मारला. सोमवारी झालेल्या पाकिस्तानविरोधातील सामन्यात भारताच्या विजयाचे ५ शिल्पकार जाणून घेऊयात.

Yash Shirke

Ind vs Pak Match Highlights : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सलग दुसरा विजय झाला आहे. भारताने ६ गडी राखून पाकिस्तावर मात केली आहे. या सामन्यातल्या ५ विजयाच्या शिल्पकाराची माहिती आम्ही देणार आहोत.

भारत विरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला भारताने जिंकला आहे. टॉस जिंकत पाकिस्तानच्या संघाने २४१ धावा केल्या. पुढे भारताने रन चेज करुन पाकिस्तावर मात केली. या सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले, अनेक नवे विक्रम बनले. एकूण भारताच्या संघाने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीही आघाडींवर चांगला खेळ केला. हा सामना जिंकण्यासाठी ५ खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे ठरले.

विराट कोहली -

विराट कोहलीचा फॉर्म परतला आहे. त्याने सामन्यात दमदार शतक ठोकले. त्याने १११ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. कारकीर्दीतले त्याचे हे ८२ वे शतक आहे. तर वनडेमधले त्याचे ५१ वे शतक आहे. या सामन्याचा विजयी चौकारदेखील विराटने मारला. त्याच्या या तुफानी खेळीमुळे भारताला विजय मिळाला. फलंदाजीसह त्याने क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली.

अक्षर पटेल -

अक्षर पटेलने सामन्याच्या नवव्या षटकात इमाम उल हकला रन आउट केले. अक्षरचा थ्रो इतका अचूक होता की इमाम पोहचण्याआधी त्याची विकेट पडल्या. त्याने हारीस रॉफला देखील धावचीत केले. सऊद शकीलला अक्षरनेच झेलबाद केले. शिवाय त्याने कर्णधार मोहम्मद रिझवानला देखील बाद केले.

कुलदीप यादव -

कुलदीप यादवने सामन्यात तुफान गोलंदाजी केली. त्याने सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीन शाह यांना बाद केले. या सामन्यात सर्वाधिक गडी कुलदीप यादवने बाद केले.

हार्दिक पंड्या -

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सामन्यात चमकला. कुलदीपपाठोपाठ हार्दिकने पाकिस्तानचे २ गडी बाद केले. त्यात बाबर आझम आणि सऊद शकील यांचा समावेश आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्येही योगदान दिले.

शुबमन गिल -

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या शुबमन गिलने सामन्यातही चांगली फलंदाजी केली. त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं खरं पण रोहीत लवकर बाद झाल्यानंतर त्याने विराह कोहलीसोबत चांगली भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT