IND vs PAK, Highlights: हार्दिक- अक्षरचा भेदक मारा अन् पाकिस्तानचा पॅकअप; भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

India vs Pakistan 1st Inning: भारत आणि पाकिस्तान या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव २४१ धावांवर आटोपला आहे.
team india
team indiatwitter
Published On

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेटला महासंग्राम सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान पाकिस्तानच्या बाजूने लागला. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पाकिस्तानचा डाव २४१ धावांवर आटोपला. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावांची गरज आहे.

team india
IND vs PAK Champions Trophy 2025: भारताने गमावली नाणेफेक; पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय

जसप्रीत बुमराहशिवाह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाची सुरुवात मोहम्मद शमीने सुरुवात केली. मात्र त्याला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्याच षटकात त्याने ११ चेंडू टाकले. या षटकात त्याने ५ वाईड चेंडू टाकले. त्यानंतर ३ षटक टाकून त्याला मैदान सोडावं लागलं होतं. पाकिस्तानच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर बाबर आझम आणि इमाम उल हकने डावाची सुरुवात केली.

team india
IND vs PAK Champions Trophy: भारत-पाकिस्तान मैदानात भिडणार, त्याआधीच सोशल मीडियावर 'वॉर', जोरदार मिम्स व्हायरल

दोघांनी मिळून ४१ धावा जोडल्या. त्यानंतर बाबर आझम २३ धावांवर माघारी परतला. बाबर बाद होताच इमाम उल हकही १० धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. सुरुवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर सौद शकील आणि मोहम्म रिझवानने शानदार शतकी भागीदारी केली. सौद शकीलने ६२ धावा केल्या. तर रिझवान ४६ धावांवर माघारी परतला. शेवटी खुशदीलने काही आकर्षक फटके मारले आणि पाकिस्तानची धावसंख्या २४० पार पोहोचवली.

भारतीय गोलंदाजांचा जलवा

ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी इतकी सोपी नव्हती, कारण वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि उसळी मिळत नव्हती. तर फिरकी गोलंदाजांचा चेंडू फिरत नव्हता. असं असतानाही भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला होता.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले. यादरम्यान त्याने ४० धावा खर्च केल्या. तर हार्दिक पंड्याने २, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

पाकिस्तान (Playing XI): इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहीर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरीस रौफ, अब्रार अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com