
भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरू व्हायला काही तासांचा अवधी उरलाय. ही मॅच पाहण्यासाठी भारतात माहौल तयार झालाय. भारत आणि पाकिस्तानची मॅच म्हटलं की, चाहत्यांचे डोळे टीव्हीकडून हटतच नाही. ही मॅच जिकणं दोन्ही संघासाठी महत्वाचं आहे. कारण जो संघ सामना हारेल तो संघ थेट चॅम्पियन ट्रॉफीच्या प्रवासातून बाद होईल. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवतोड मेहनत घेत आहेत. अशातच भारत आणि पाकिस्तानमधील नागरिक एकमेकांती मीम्सद्वारे फिरकी घेत आहेत.
मॅच सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर माहोल तयार झालाय. माध्यमांमध्ये मीम्सचा पाऊस पडलाय. यातील काही मीम्स सोशल माध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाले आहे.
पाकिस्तानचा कमबॅक होणार?
हा मीम नाही तर, एका शोमधील क्लिप आहे. ज्यामध्ये टीम मेकर्स मस्ती करताना दिसत आहेत. यात एक व्यक्ती पाकिस्तान टीमकडे कमबॅकची संधी आहे. भारत संघाकडून पराभव झाल्यानंतर ते पुन्हा पाकिस्तानात परकू शकतात.
नजर ना लगे
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी एक मिमरनं भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना काळा टीका आणि कानात लिंबू मिरची लटकवली आहे. जेणेकरून कुणालाही कुणाचीही नजर लागणार नाही. कॅप्शनमध्ये त्याने 'प्लीज पाकिस्तानविरूद्ध हारू नका', असं लिहिलं आहे.
संडे को आ..
एका नेटकऱ्यानं भन्नाट मीम तयार केलं आहे. हा मीम टेम्पलेट परेश रावल यांच्या हेराफेरी या चित्रपटातील आहे. ज्यामध्ये चित्रपटातील एक डायलॉग आहे. भारत पाकिस्तानला 'संडे सुबह अच्छेसे नहाके आ', असं म्हणत आहे.
दुबईमध्ये आराम करताना टीम इंडीया
आयसीसीकडे अपील केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जात आहेत. ज्यासाठी भारतविरूद्धच्या प्रत्येक संघाला दुबईला यावे लागेल. या मीममध्ये दुबईमध्ये भारत आरामात चिल करत असून, उर्वरीत संघ भारतविरूद्ध खेळण्यासाठी दुबईला रवाना होत आहेत.
ही भविष्यवाणी खरी ठरणार?
कुंभ मेळ्यात आयआयटी बाबा प्रचंड चर्चेत आले होते. त्यांनी नुकतंच एक भाकित केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.