
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पाचवा सामना आज होत असून यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आलेत. दोन्ही संघ विजयाचे दावेदार असल्याने आजचा सामना रोमांचकारी ठरणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना दुंबईमधील स्टेडियमवर होत असून संघाने नाणेफेक जिंकलीय. टीम इंडियाचा पाकिस्तानसोबतचा शेवटचा सामना सुमारे आठ महिन्यांपूर्वी झाला होता.
२०२४ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले होते. आता ती चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी दुबईतील मैदानावर असणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात टॉसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. जर टीम इंडियाने टॉस जिंकली तर ते प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात येऊ शकते.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नेहमी सज्ज असते. भारताकडे घातक गोलंदाजी देखील आहे. जर गोलंदाजांनी त्यांची जादू दाखवली तर पाकिस्तानला रन्स करणं कठीण होऊ शकतं. यानंतर, जर फलंदाजांनी त्यांचं काम चांगलं केलं तर भारत जिंकू शकतो.
भारताची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शामी
पाकिस्तानची प्लेईंग ११
इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), तय्यब ताहीर, सलमान अगा, खुशदील शाह, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरीस रौफ, अबरार मोहम्मद
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.