विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला आहे. भारतीय संघाने १५० धावांचा पल्ला गाठला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने ६२ चेंडूंचा सामना करत शानदार अर्धशतकी खेळी केली आहे.
भारताला दुसरा मोठा धक्का बसलाआहे. गिल बाद होऊन परतला माघारी आहे.
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला आहे.
भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४२ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना रोहितने दमदार सुरुवात केली आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानचा डाव २४१ धावांवर आटोपला आहे.
पाकिस्तानला लागोपाठ २ धक्के बसले आहेत. कुलदीपकडे हॅट्रीकची संधी आहे.
पाकिस्तानला सहावा धक्का बसला आहे. सलमान अली आगा १९धावांवर तंबूत परतला.
पाकिस्तानला लागोपाठ ३ मोठे धक्के बसले आहेत.
पाकिस्तानला लागोपाठ २ धक्के बसले आहेत. मोहम्मद रिझवाननंतर सौद शकील ६२ धावा करत माघारी परतला.
या सामन्यात पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. रिझवान ४६ धावा करत परतला तंबूत
दोन्ही सलामीवर बाद झाल्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवानने फलंदाजीचा धुरा सांभाळली आहे. त्याने सउदसोबत भागीदारी करत धावासंख्या शंभरीच्या पार नेली आहे.
पाकिस्तानची सुरुवात चांगली होती पण आता त्यांच्यावर भारतीय गोलंदाजांनी दबाव टाकला आहे. ११ ओव्हरनंतर पाकिस्तानचा स्कोर ५५/२ असा आहे.
बाबरनंतर पाकिस्तानला अजून एक धक्का बसला आहे. पाकिस्तानचा दुसरा ओपनर इमाम-उल-हक माघारी परतला आहे
बाबर आझमच्या रूपाने पाकिस्तानला सामन्यात पहिला धक्का बसला. तो २६ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर केएल राहुलने एक शानदार झेल घेतला. I
पहिल्या ओव्हरमध्ये ५ वाईड टाकून रोहित शर्माने पुन्हा शमीला गोलंदाजी दिली. मात्र स्वतःच्या तिसऱ्या ओव्हरनंतर मोहम्मद शमी मैदानाबाहेर गेला आहे.
भारताकडून पहिली ओव्हर मोहम्मद शमीने टाकली. या ओव्हरमध्ये ६ रन्स झाले. या काळात शमी दबावाखाली दिसला. त्याने ५ वाईड बॉल टाकले.
इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), तय्यब ताहीर, सलमान अगा, खुशदील शाह, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरीस रौफ, अबरार मोहम्मद
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शामी
पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग-११ मध्ये भारतीय टीमने कोणतेही बदल केले नाहीत. रोहितची टीम पाकिस्तानविरुद्धचा सामना त्याच ११ खेळाडूंसोबत खेळेल ज्यांच्यासोबत टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सामना खेळली होती.
भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ती पहिलीच वेळ होती. तेव्हापासून ही स्पर्धा आयोजित होऊ शकली नाही. आता ८ वर्षांनंतर, भारत त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानला दोनदा, २०२२ च्या टी-२० विश्वचषक, २०२४ च्या टी-२० विश्वचषक, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक आणि २०२३ च्या आशिया कपमध्ये प्रत्येकी एकदा पराभूत केलं. २०२२ च्या दुबईतील टी२० विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले होते परंतु सुपर फोरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या ९ पैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पाकिस्तानचा एकमेव स्फोटक ओपनर फखर जमान टीमबाहेर आहे आणि त्याची जागी इमाम-उल-हकला देण्यात आलीये. पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात फिल्डींग करताना फखर झमानला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला.
या भारत-पाकिस्तान सामन्यात दोन्ही टीमच्या खेळाडूंवर खूप दबाव असेल. सध्याच्या फॉर्मकडे पाहता, टीम इंडियाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघातील स्टार खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत.
- बजरंगबलीला साकडं घालत, भारतीय टीमसाठी हवन आणि पुजा
- ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी सामना आहे...
- पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबतच्या सामन्यात भारत जिंकावा यासाठी बजरंगबलीला साकडं
- आजच्या भारत पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यामुळे नागपूरच्या क्रिकेट प्रेमिंमध्ये मोठा उत्साह आहे
- आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून क्रीकेटप्रेमिंना मोठ्या अपेक्षा आहे
- भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय टीम जिंकावी, यासाठी नागपूरात खामला चौकात होम हवन पूजा करण्यात आलीय...
- बजरंगबलीच्या मंदिरात साकडं घालत, भारतीय टीमसाठी हवन आणि पुजा अर्चा करण्यात आलीय..
- ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी सामना आहे.
- त्याकरिता नागपूरच्या खामला चौकातील हनुमान मंदिरात हवन करून टीम इंडिया जिंकण्यासाठी बजरंगबलीला साकडे घालण्यात येत आहे..
- सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी खामला येथील हनुमान मंदिरात पूजा पाठ...
- विराट कोहली, रोहित शर्मा सह इतर भारतीय खेळाडूंचे फोटो घेवून क्रिकेट समर्थक बसले पूजेला बसले आहे..
बाबर आझम, सउद शकील, मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, सलमान अली आगा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, अबरार अहमद, हारिस रऊफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप जाधव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.