IND vs PAK: लाईव्ह सामन्यात तुफान राडा! रिझवान अन् राणाजी भिडले; पाहा VIDEO

India vs Pakistan, Mohammad Rizwan vs Harshit Rana: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हर्षित राणा आणि मोहम्मद रिझवान भिडले, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
IND vs PAK: लाईव्ह सामन्यात तुफान राडा! रिझवान अन् राणाजी भिडले; पाहा VIDEO
mohammad rizwantwitter
Published On

भारत - पाकिस्तान सामना हा फायनल जिंकण्यापेक्षा कमी नसतो. कारण दोन्ही संघांसमोर केवळ एकच आव्हान असतं ते म्हणज, प्रतिस्पर्धी संघाला हरवायचं. त्यासाठी खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येत असतात. कधी कधी लाईव्ह सामन्यात राडा झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. असंच काहीसं चित्र भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाहायला मिळालं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

IND vs PAK: लाईव्ह सामन्यात तुफान राडा! रिझवान अन् राणाजी भिडले; पाहा VIDEO
IND vs PAK Champions Trophy 2025: भारताने गमावली नाणेफेक; पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय

तर झाले असे की, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या डावातील २५.३ षटकांचा खेळ झाल्यानंतर पाकिस्तानला २ गडी बाद १०३ धावा करता आल्या होत्या. त्यावेळी मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलची जोडी जमली होती.

हर्षित राणा गोलंदाजीसाठी आला, त्यावेळी वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद रिझवानने हर्षित राणाला खांदा मारला. पाकिस्तानचे फलंदाज स्लो खेळी करत होते. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्येही तणावाचे वातावरण होते.

IND vs PAK: लाईव्ह सामन्यात तुफान राडा! रिझवान अन् राणाजी भिडले; पाहा VIDEO
IND vs PAK : मोहम्मद शमीला झालंय तरी काय? पहिल्याच षटकात टाकले ११ बॉल, नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, रिझवानने शॉट मारल्यानंतर तो एक धाव घेण्यासाठी धावला. त्यावेळी हर्षित राणा मध्ये आला. त्यामुळे हर्षितला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी रिझवानने त्याला धक्का मारला. राणाला हे मुळीच आवडलं नाही. त्यामुळे तो मोहम्मद रिझवानवर भडकला. त्यावेळी तो रिझवानला काहीतरी बोलताना दिसून आला. मात्र रिझवानने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पाकिस्तानने केल्या २४१ धावा

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या बाबर आझमने २३, तर इमाम उल हकने १० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सौद शकीलने ६२ धावांची खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने ४६ धावा चोपल्या. शेवटी खुशदीलने ३८ धावा केल्या. पाकिस्तानचा संपूर्ण डाव २४१ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com