Virat Kohli : जिथे विषय गंभीर, तिथे विराट खंबीर; पाकिस्तानविरोधात ठोकलं विक्रमी शतक

Virat Kohli Latest News : पाकिस्तानविरोधात विराट कोहलीन विक्रमी शतक ठोकलं आहे. विराट कोहलीने आज ८२ वे शतक ठोकलं आहे. विराट कोहली फलंदाजीमुळे भारताचा विजय सोपा झाला.
Virat Kohli News
Virat Kohli Saam tv
Published On

क्रिकेटच्या मैदानात मीच किंग आहे, हे विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. आज रविवारी पाकिस्तानविरोधात सुरु असलेल्या सामन्यात शतक ठोकत भारताला जिंकून दिलं आहे. विराट कोहलीने फलंदाजी करत त्याचं कौशल्य सिद्ध केलं आहे. विराट कोहलीने शेवटचा चौकार लगावत भारताला जिंकून दिलं आहे.

विराट कोहलीने ठोकलं ८२ वे शतक

भारत आणि पाकिस्तानविरुद्ध सामना हा नेहमी तणावपूर्ण असतो. दोन्ही संघातील खेळाडूंवर मोठं आव्हान असतं. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातील भारतावर दबाव निर्माण केला. मात्र, विराच कोहलीने डाव सावरला. पाकिस्तानविरोधात आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकलं. त्याने १११ चेंडूत नाबाद १०० धावा ठोकल्या आहेत. विराटने फलंदाजी करताना ७ चौकार लगावले.

Virat Kohli News
Virat Kohli Record: किंग कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरला मागे सोडत बनला नंबर १

१६ वर्षांचा दुष्काळ संपला

विराट कोहलीने पहिल्यांदा २००९ साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराट कोहलीने शतक ठोकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या शतकासाठी १६ वर्षांची वाट पाहावी लागली आहे. विराट कोहलीला २०२३ वनडे वर्ल्डकपनंतर शतक ठोकण्याची संधी मिळाली. त्याने परदेशी मैदानात ५३१ दिवसानंतर शतक ठोकलं आहे. त्यामुळे त्याचासाठी ही खेळी खास ठरली आहे.

Virat Kohli News
IND vs PAK Champions Trophy 2025: भारताने गमावली नाणेफेक; पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय
Virat Kohli News
IND vs PAK: लाईव्ह सामन्यात तुफान राडा! रिझवान अन् राणाजी भिडले; पाहा VIDEO

दरम्यान, विराट कोहलीने आयसीसी वनडेमध्ये पाकिस्तानविरोधात चोथ्यांदा ५० हून अधिक धावा करण्याचाही विक्रम केला आहे. विराट व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने तीनहून अधिक वेळा ही कामगिरी केलेली नाही. विराटशिवाय विव रिचर्ड्स आणि सचिन तेंडुलकरने ३-३ वेळा पाकिस्तानविरोधात ५० हून अधिक धावा कुटल्या आहेत. विराटने आयसीसी वनडेमध्ये २३ व्या वेळी ५० हून अधिक धावसंख्या केल्या आहेत. सचिन तेंडुलकरनेही वनडेमध्ये २३ वेळा ५० हून अधिक धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com