ind vs eng x
Sports

Ind Vs Eng : टीम इंडिया इतिहास रचणार? कारण लीड्सवरील ७७ वर्षाचा इतिहास सांगतोय भारत जिंकणार...

IND vs ENG 1st Test : इंग्लंडमधील लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. सामन्यातील पाचवा दिवस सुरु आहे. या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Yash Shirke

Ind Vs Eng कसोटी मालिकेतील पहिला सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे. पाचवा दिवस सुरु होण्याआधी इंग्लंडसमोर ९० ओव्हर्समध्ये ३५० धावा करण्याचे आव्हान होते. आता सामना सुरु झाल्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. या क्रिकेट मैदानाचा इतिहास खूपच रंजक आहे.

इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा रनचेज ४०४ धावांचा आहे. १९४८ च्या अ‍ॅशेस मालिकेदरम्यान लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४०४ धावांचे लक्ष गाठत इंग्लंडचा पराभव केला होता. हे आतापर्यंतचे इंग्लंडच्या भूमीवर रनचेज केलेले सर्वात मोठे लक्ष्य होते. आता भारताने इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लीड्सच्या मैदानावर कधीही ३५९ धावांपेक्षा मोठे लक्ष्य गाठता आलेले नाही. फक्त लीड्सच नाही, तर इंग्लंडला घरच्या मैदानावर कधीही ३५९ धावांपेक्षा मोठे आव्हान पार पाडणे जमले नाही.

तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर भारताकडून यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी शतकीय खेळी केली. त्यानंतर ४७१ धावांवर भारताचा संघ ऑलआउट झाला.

त्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ४६५ धावांवर इंग्लंडच्या संघातील सर्व खेळाडू बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये भारतीय फलंदाज मैदानात उतरले. केएल राहुल आणि रिषभ पंत या दोघांनी शतकीय कामगिरी करत भारताची धावसंख्या पुढे नेली. ३६४ वर इंग्लंडने भारताला रोखले. त्यानंतर इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीसांचं, राऊतांनी गायलं फडणवीसांचं गुणगान

Maharashtra Live News Update: दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना लागली आग, १० ते १२ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

Chhagan Bhujbal: आरक्षण जीआरमुळे भुजबळ नाराज, मंत्रिमंडळ बैठकीवरही भुजबळांचा बहिष्कार

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर टिकणार का?

Husband-Wife: तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त फोनकडे लक्ष देतो, फक्त अफेअर नाही, असू शकतं 'हे' कारण

SCROLL FOR NEXT