
Ind Vs Eng कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. भारताचा तरुण संघ लीड्समध्ये इंग्लंड विरोधात खेळत आहे. आज (२४ जून) या सामन्याचा शेवटचा आणि निर्णायक दिवस आहे. इंग्लंडसमोर ३५० धावांचे लक्ष आहे. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे लंडनमध्ये निधन झाले.
काल (२३ जून) हृदयविकाराच्या झटक्याने दिलीप दोशी यांची प्राणज्योत मालवली. ते ७७ वर्षांचे होते. क्रिकेट जगतामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिली. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, रवी शास्त्री, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी दिलीप दोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दिलीप दोशी यांनी वयाच्या ३२ व्या वर्षा कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ३३ सामन्यांमध्ये त्यांनी ११४ विकेट्स घेतल्या होत्या. क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्यांनी तब्बल सहा वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या. १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३.९६ च्या सरासरीने त्यांनी २२ विकेट्स घेतल्या. दिलीप दोशी यांनी सौराष्ट्र, बंगाल, वॉरविकशायर आणि नॉटिंगहॅमशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळले होते.
ज्या वेळेस दिलीप दोशी यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्या वेळेस भारतीय संघामध्ये अनेक दिग्गज फिरकीपटू होते. त्यामुळे दोशी यांना खेळण्याच्या मर्यादित संधी मिळाल्या. १९८१ च्या मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये दोशी यानी उत्कृष्ट कामगिरी केली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दोशी लंडनमध्ये स्थायिक झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.