रोहित शर्मा कसोटीपाठोपाठ वन डेतूनही निवृत्त? २३ जूनचा साधला मुहूर्त; इंस्टा पोस्टने वेधले लक्ष

Rohit Sharma Instagram Post : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून मे २०२५ मध्ये निवृत्ती जाहीर केली. त्याने इन्स्टा स्टोरी शेअर करत निवृत्तीची घोषणा केली होती. सध्या रोहितच्या आणखी एका इन्स्टा स्टोरीची चर्चा पाहायला मिळत आहे.
Rohit Sharma
Rohit Sharmax
Published On

Ind Vs Eng कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. २०२४ चा विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीदरम्यान मी वनडे क्रिकेट खेळणार आहे, असे रोहित शर्मा म्हणाला होता. रोहित ३७ वर्षांचा आहे. २०२७ वनडे विश्वचषक खेळणे रोहितसाठी अवघड मानले जात आहे. यादरम्यान इन्स्टा स्टोरीमुळे वनडे फॉरमॅटमधून रोहित निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आजचा २३ जून हा हिटमॅन रोहित शर्माच्या क्रिकेट कारकीर्दीतील महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी २००७ मध्ये रोहितने आयर्लंड विरुद्ध खेळताना भारताच्या वनडे संघात पदार्पण केले होते. आज त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीला तब्बल अठरा वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने रोहितने त्याच्या हेल्मेटचा फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली.

rohit sharma insta post
rohit sharma insta postInstagram
Rohit Sharma
Rishabh Pant : सूजवलं रे याने एकाच जागी मारून-मारून ; स्टम्प माईकमध्ये रिषभ पंतचे 'ते' शब्द कैद

मागील १८ वर्षांपासून रोहित शर्मा भारतीय संघासाठी उकृष्ट कामगिरी केली आहे. ६७ कसोटी आणि २७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्तीनंतर २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी रोहित शर्मा सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अठरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल रोहितने इन्स्टास्टोरी शेअर केली.

Rohit Sharma
Ind Vs Eng : ४४७ धावांपासून नजर लागली, एक-एकजण तंबूत परतला, अवघ्या २४ धावांमध्ये अर्धा संघ गारद

आयपीएल २०२५ संपल्यानंतर रोहितने काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अबू धाबीमध्ये रोहित त्याच्या कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करत आहे. पत्नी रिकीता, मुलगी समायरा, मुलगा अहान आणि अन्य कुटुंबीयांचा अबू धाबीमधील फोटो शेअर केले. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२५ मध्ये खेळताना रोहितने चांगली कामगिरी केली होती. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो इंग्लंड दौऱ्यावर गेला नाही.

Rohit Sharma
Cricket : प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, Ind Vs Eng कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com