Rishabh Pant : सूजवलं रे याने एकाच जागी मारून-मारून ; स्टम्प माईकमध्ये रिषभ पंतचे 'ते' शब्द कैद

Rishabh Pant Video : रिषभ पंतकडे भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या पहिल्या डावात पंतने शतकीय कामगिरी केली. या सामन्यादरम्यान रिषभ पंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rishabh Pant Video
Rishabh Pant Videox
Published On

Ind vs Eng 1st Test : भारताचा युवा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक रिषभ पंत त्याच्या आगळ्या वेगळ्या फलंदाजीसाठी लोकप्रिय आहे. यष्टिरक्षण करताना पंत इतर खेळाडूंशी मजामस्ती करत असतो. मैदानावर असताना रिषभ पंत वेगळ्याच अवतारात असतो. अनेकदा त्याच बोलणं स्टम्पमाईकमध्ये कैद होते. अशाच एका स्टम्पमाईकमधील संवादाची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

Rishabh Pant Video
Cricket : प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, Ind Vs Eng कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

फलंदाजी करताना रिषभ पंतने शतकीय खेळी केली. १७८ चेंडू खेळत त्याने १३४ धावा मारल्या. यात बारा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. सामन्यादरम्यान रिषभ पंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंचचा मजेशीर संवाद कैद झाला आहे.

शतक ठोकल्यानंतरही रिषभ पंत आक्रमक शैलीत फलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला शुभमन गिल पाठोपाठ करुण नायरची विकेट पडली. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात उतरला. तेव्हा १०८ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूदरम्यान रिषभने जडेजाला 'सूजवलं रे याने एकाच जागी मारून-मारून' असे म्हटले. हा संवाद स्टम्पमाईकमध्ये कैद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rishabh Pant Video
Sanjay Raut : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच एकनाथ शिंदेंकडे दिलेला, पण...; शिंदेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा आढावा -

तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीमधील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्लेमध्ये सुरु आहे. पहिल्या डावात भारताने ४७१ धावा केल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ४६५ धावांवर इंग्लंडच्या संघाला ऑलआउट केले. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या पाठोपाठ प्रसिद्ध कृष्णाने ३ आणि मोहम्मद सिराजने २ गडी बाद केले. आता पुन्हा भारताची फलंदाजी सुरु आहे.

Rishabh Pant Video
Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com