Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Actor Death News : जेष्ठ अभिनेते जॅक बेट्स यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ९६ वर्षांचे होते. त्यांनी स्पायडरमॅन, बॅटमॅन फॉरएव्हर आणि बॅटमॅन अँड रॉबिन अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये जॅक झळकले होते.
Actor Death
Actor Death X
Published On

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता जॅक बेट्स यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. झोपेत असतानाच जॅक बेट्स यांचे निधन झाले अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. जॅक यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. जॅक बेट्स यांनी स्पायडरमॅन, बॅटमॅन फॉरएव्हर अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते.

ज्येष्ठ अभिनेते जॅक बेट्स यांचे १९ जून २०२५ रोजी लिफोर्नियातील लॉस आसुस येथील त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. जॅक यांचा पुतण्या डीन सुलिव्हन यांनी त्यांच्या मृत्यूबाबतची माहिती दिली. जॅक त्यांच्या घरात झोपले होते आणि झोपेतच शांतपणे त्यांचे निधन झाले, असे डीन सुलिव्हन यांनी म्हटले आहे. पण जॅक बेट्स यांच्या मृत्यूचे कारण अजूनही उघड झालेले नाही. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे जॅक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Actor Death
Airplane Accident : मोठा विमान अपघात टळला; पायलटनं दिला होता Mayday कॉल, कारण...

स्पायडरमॅन, बॅटमॅन फॉरएव्हर अशा लोकप्रिय अमेरिकन चित्रपटांमध्ये जॅक बेट्स यांनी काम केले होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९२९ रोजी फ्लोरिडामधील मियामी येथे झाला होता. त्यानंतर त्यांचे बालपण जर्सी सिटीमध्ये गेले. त्यांनी मियामी विद्यापीठातून अभिनयाची पदवी घेतली होती. पदवी मिळवल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जॅक न्यूयॉर्कला गेले होते.

Actor Death
Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

१९५३ मध्ये विल्यम शेक्यपियरच्या नाटकावर आधारित चित्रपटात काम करुन जॅक बेट्स यांच्या सिनेकारकीर्दीची सुरुवात झाली. १९६० ते १०६२ या दरम्यान ते चेकमेट नावाच्या लोकप्रिय मालिकेत झळकले. या मालिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक चित्रपट, टीव्ही शोमध्ये जॅक बेट्स यांनी काम केले. गॉड्स अँड मॉन्स्टर्स, द असॅसिनेशन ऑफ ट्रॉटस्की, फॉलिंग डाउन, बॅटमॅन फॉरएव्हर आणि बॅटमॅन अँड रॉबिन अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

Actor Death
Tushar Ghadigaonkar : नैराश्य, कौटुंबिक वाद की...; अभिनेता तुषार घाडीगावकरनं जीवन का संपवलं? सिनेक्षेत्रात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com