Tushar Ghadigaonkar : नैराश्य, कौटुंबिक वाद की...; अभिनेता तुषार घाडीगावकरनं जीवन का संपवलं? सिनेक्षेत्रात खळबळ

Tushar Ghadigaonkar Death : मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आत्महत्या केल्याने मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. काम मिळत नसल्याने त्याने स्वत:ला संपवल्याचे म्हटले जात होते. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
Tushar Ghadigaonkar
Tushar Ghadigaonkarx
Published On

मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता तुषार घाडीगावकर याने काल (२० जून) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण मराठी कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तुषारने काम मिळत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असे म्हटले जात होते. पण या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.

तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणात नवा पैलू समोर आला आहे. नव्या माहितीनुसार, तुषार घाडीगावकरकडे कामाची कमचरता नव्हती. तो सन मराठी वाहिनीवरील सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये काम करत होता. त्याच्या एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरु होते. त्यामुळे या घटनेमागे व्यावसायिक नव्हे, तर कौटुंबिक कारण असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tushar Ghadigaonkar
Ind Vs Eng 1st Test : आयपीएलमध्ये हिरो इंग्लंडमध्ये झिरो! मेरीटवर टीम इंडियात आले, पण पहिल्याच सामन्यात फेल झाले

मुंबईतील भांडुपमध्ये तुषार घाडीगावकरचे बालपण गेले. रुपारेल कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धांमधून त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तुषार अनेक मराठी मालिकांमध्ये झळकला होता. तो भांडुपमध्ये पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होता. त्याचे आईवडील देखील भांडुपमध्ये वास्तव्याला होते. कौटुंबिक वादामुळे तो तणावात होता असे म्हटले जात आहे.

Tushar Ghadigaonkar
Rishabh Pant : रिषभ पंतचा जलवा! बेन स्टोक्सच्या नाकावर टिच्चून झळकावले शतक; टीम इंडिया चारशे पार

शुक्रवार २० जून रोजी तुषारची पत्नी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. संध्याकाळी जेव्हा त्याची पत्नी घरी परतली, तेव्हा तिला तुषारचा मृतदेह आढळला. पत्नी कामावर गेल्यानंतर तुषारने घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरु असून तुषारने आत्महत्या का केली या प्रश्नाचे उत्तर लवकरच समोर येईल असे म्हटले जात आहे.

Tushar Ghadigaonkar
Pune : नोकरीवरुन काढल्याचा राग, सुरक्षारक्षकावर आधी चाकूने हल्ला, मग वीट उचलली अन्... घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com