Rishabh Pant : रिषभ पंतचा जलवा! बेन स्टोक्सच्या नाकावर टिच्चून झळकावले शतक; टीम इंडिया चारशे पार

Ind Vs Eng Test : इंग्लंडमधील लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा उपकर्णधार रिषभ पंतने शतक ठोकले आहे. आता भारताची धावसंख्या चारशेपार गेली आहे.
Rishabh Pant
Rishabh Pant X
Published On

Rishabh Pant Century : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांच्यानंतर भारताचा उपकर्णधार रिषभ पंतची बॅट इंग्लंडमध्ये तळपली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रिषभ पंतने खणखणीत शतक ठोकले आहे. शुक्रवारी (२० जून) लीड्स येथे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफीमधील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. मालिकेच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने शतकीय कामगिरी केली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर युवा शुभमन गिलकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद आणि रिषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले. इंग्लंड दौऱ्यावर दोघांनीही शतकीय कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल १०१ धावांवर बाद झाला, तर डावाच्या शेवटी शुभमन गिलने शतक पूर्ण केले. आता दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने शतक ठोकले आहे. कसोटी मालिकेच्या सुरुवातीलाच भारतीय फलंदाजांनी आपला क्लास दाखवला आहे.

Rishabh Pant
Pune : दगडीचे ढिगारे टाकून वरंधा घाट रस्ता बंद! भोर-महाड मार्गावर वाहतुकीला ब्रेक, पर्यायी मार्ग कोणते?

पहिला कसोटी सामना

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. टॉसनंतर दोन्ही संघांच्या अंतिम अकरा खेळाडूंची घोषणा करण्यात आली. या सामन्यातून साई सुदर्शन कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर करुण नायरने आठ वर्षांनी भारतीय संघात कमबॅक केले.

Rishabh Pant
Pune : नोकरीवरुन काढल्याचा राग, सुरक्षारक्षकावर आधी चाकूने हल्ला, मग वीट उचलली अन्... घटना सीसीटीव्हीत कैद

भारतासाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही सलामी जोडी फलंदाजीसाठी उतरली. दोघांनीही चांगली भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना नमवले. केएल राहुल ४२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमावर आलेला साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. चौथ्या क्रमावर कर्णधार शुभमन गिल खेळण्यासाठी आला. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या दिवशी शतक ठोकले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने दोन गडी बाद केले. तर ब्रायडन कार्सने एक विकेट घेतली.

Rishabh Pant
Pune Crime : शर्टने गळा आवळला, हात बांधले, टॉवेलने तोंड झाकलं; शुल्लक कारणावरुन तरुणाची निर्घृण हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com