Sanjay Raut : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच एकनाथ शिंदेंकडे दिलेला, पण...; शिंदेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष फुटला, तेव्हा सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. शिवसेनेला हायजॅक करण्याचा प्रस्ताव त्यांनीच एकनाथ शिंदेंकडे मांडला होता, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

Shivsena News : गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना पक्ष फुटला, त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. पक्षाला हायजॅक करण्याला प्रस्ताव त्यांनीच शिंदे यांच्याकडे मांडला होता, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

शिवसेनेचे नेते शहाजी बापू यांनी शिवसेना फुटली, तेव्हा सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते, मात्र राऊत यांना त्यावेळेस ३५ ते ३६ आमदारांनी विरोध केला असे म्हटले होते. याबाबतीत मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. मात्र ते त्यावेळेस थांबले. संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Maharashtra Politics
Abu Azmi : आषाढी वारीबाबत अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य; वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही रस्त्यावर नमाज पठन केल्यावर मात्र...

भास्कर जाधव यांचीही संजय राऊतांवर परखड

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी देखील संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना पक्षातून मंत्रिपद न मिळाल्याची खंत देखील भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. आठवेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असे वक्तव्य त्यांनी केले.

Maharashtra Politics
Air India च्या विमानात चढण्यासाठी पठ्ठ्या चक्क मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावला, नंतर जे घडलं त्यानं...

संजय राऊत सावरण्याची भाषा करतात. भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज होत नाही. सगळ्या गोष्टींचे मला भान आहे. मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज असा संदेश पोहोचवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो. मात्र पक्षाकडून कधीही तसं होत नाही. ज्येष्ठ नेत्यांनतर भाषण करण्याची संधी मिळते, असे म्हणत भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

Maharashtra Politics
Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com